डॉक्टरांच्या ‘बारामती पॅटर्न’चे सर्वत्र कौतुक 'हे' आहे कारण 

pregnanat lady
pregnanat lady

बारामती - फु फ्पुसात १०० टक्के संसर्ग झालेल्या कोरोनाबाधित Corona गर्भवती Pregnant महिलेवर यशस्वी उपचार करण्यात बारामती Baramati येथील मेहता हॉस्पिटलमध्ये Mehata Hospital डॉक्टरांना यश आले आहे. व्हेंटीलेटर वर असणाऱ्या या महिलेची सुखरुप प्रसुती झाली आहे. या महिलेने एका गोंडस मुलीला Girl  जन्म दिला आहे. कोरोनाबाधित झाल्याने या महिलेचा एचआरसीटी स्कोअर १०० टक्के म्हणजेच २५ होता. या गंभीर परीस्थितीतुन डॉक्टरांनी तिला बाहेर काढत तिच्यासह बाळाला जणु जीवदानच दिले आहे. डॉक्टरांच्या या ‘बारामती पॅटर्न’ Baramati pattern चे सर्वत्र कौतुक होत आहे. Doctor's 'Baramati pattern' is universally appreciated because 

शहरातील फिजिशियन डॉ सुनील ढाके ,स्त्रीरोग तज्ञ डॉ विशाल मेहता, डॉ टेंगले,डॉ अुनराधा भोसले, भुलतज्ञ डॉ सुजित अडसुळ,डॉ.निकिता मेहता, बालरोगतज्ञ डॉ अमित कोकरे, होमिओपॅथी तज्ञ डॉ अमोल भगत ,डॉ हर्षा जाधव यांनी या महिलेवर यशस्वी उपचार केले आहेत.

हे देखील पहा -

त्यासाठी केईएम हॉस्पिटलचे डॉ विवेक जोशी,डॉ हर्षवर्धन व्होरा,डॉ शुभांगी वाघमोडे, डॉ आनंद गवसणे यांचा सल्ला व मार्गदर्शन महत्वाचा ठरल्याचे डॉ विशाल मेहता यांनी पत्रकारांशी  बोलताना सांगितले. Doctor's 'Baramati pattern' is universally appreciated because 

याबाबत डॉ मेहता आणि डॉ ढाके यांनी सांगितले कि, ६ एप्रिल रोजी गर्भारपणाचा ९ महिन्यांचा कालावधी पुर्ण झालेली  २८ वर्षीय  महिला रुग्ण रुग्णालयात दाखल झाली. हि महिला मुळची शेतकरी कुटुंबातील असुन तिला ३ वर्षांची एक मुलगी आहे.तिचे संपुर्ण कुटुंब कोरोना बाधित होते.या महिलेला देखील दाखल करताना कोविडमुळे ताप,खोकला,धाप लागणे असा त्रास होता.तसेच आॅक्सिजन पातळी ९० ते ९२ दरम्यान होती.

दोन तीन दिवसांनी तिची ऑक्सीजन पातळी आणखी खालावली. कोविड मेडिकल मॅनेजमेंट नुसार तिच्यावर उपचार सुरु केले.या दरम्यान तिला ऑक्सीजनची गरज भासु लागली. १० एप्रिल रोजी हि महिला अत्यवस्थ झाली. तिला व्हेंटीलेटरवर घेण्याची वेळ आली.महिलेचा एचआरसीटी स्कोअर २५ असल्याने अतिशय नाजुक अवस्था होती.रक्ताचे रीपोर्ट देखील चांगले नव्हते. त्यातच तिला प्रसुतीकळा सुरु झाल्या.मात्र, पहिले सिझर असल्याचे आता देखील सिझरच करणे गरजेचे होते.संध्याकाळी डॉक्टरांनी निर्णय घेत हि कोरोना संसर्गाचा धोका पत्करुन गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली.यावेळी महिलेने एका सुदृढ बालीकेला जन्म दिला.रुग्ण व्हेंटीलेटरवर असताना हि शस्त्रक्रिया करण्यात आली.त्यानंतर बाळाला चिरायु च्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. या बाळाची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. Doctor's 'Baramati pattern' is universally appreciated because 

बाळाला जन्म दिल्यानंतर ती महिला १३ दिवस व्हेंटीलेटरवर अतिदक्षता विभागात अत्यावस्थ होती.या दरम्यान डॉक्टरांनी न हारता सुंपुर्ण मेडीकल मॅनेजमेंटचा वापर केला.हाय रीस्क घेत त्या रुग्णाला मोठ्या वैद्यकीय कौशल्याचा वापर करीत धोकादायक स्थितीतुन बाहेर काढले.

योग्य वेळी योग्य निर्णय घेवुन आवश्यक उपचार करण्यात आले.२४ तास रुग्णाकडे  सेवाभावी वृत्तीने स्टाफने लक्ष दिले.स्वच्छता,तत्पर सेवा असल्याचे रुग्णाला याचा फायदा झाला.शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला कोणताही त्रास झाला नाही .या दरम्यान रुग्णाचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.रुग्ण व्हेंटीलेटरवर असताना तिच्या मांडीवर बाळ दिले.त्यामुळे रुग्णाची जगण्याची इच्छा प्रबळ झाल्याचे डॉ .विशाल मेहता यांनी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com