'ही' आहेत किडनी खराब होण्याची ६ लक्षणे जाणून घ्या....

There are some symptoms that indicate kidney failure
There are some symptoms that indicate kidney failureSaam TV

काही  आजारांच्या लक्षांनकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ते जीवघेणे देखील ठरू शकतात. त्यापैकी किडनीचा आजार हा जर वेळीच ओळखला नाही तर हा जीवघेणा होऊ शकतो. किडनी आपल्या शरीराचा तो भाग आहे जी शरीरातील घाण काढण्यासाठी काम करत असते. आपल्या दोन्ही किडनी मध्ये नेफ्रॉन्स नावाचे लाखो फिल्टर असतात. हे आपले रक्त शुद्ध करण्याचे काम करत असतात.There are some symptoms that indicate kidney failure

आपल्या किडनीमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असली कि, विषारी पदार्थ शरीरातून बाहेर निघत नाही यामुळे आपल्या शरीरात बरेच रोग उद्भवू शकतात.

हे देखील पहा -

त्यामुळे हे आजार टाळण्यासाठी, अशी काही 6 लक्षणे आहेत ती जाणून घ्या ज्यामुळे किडन्या निकामी होण्याचे संकेत देतात. -

किडनी खराब होण्याची लक्षणे -

1 युरिनरी फंक्शन मध्ये बदल होणे
सर्वात पहिला बदल म्हणजे आपल्या युरिनरी फंक्शन मध्ये बदल होणे. किडनी मध्ये कोणतीही समस्या उद्भवल्यास लघवीचा रंग, तसेच प्रमाण आणि कितीवेळा लघवी होते या वेळेमध्ये मध्ये बदल होतात.

2 शरीरात सूज येते 
शरीरातून बाहेर न निघणारे द्रव आणि घाण याची समस्या निर्माण होत असते. ज्यामुळे शरीराच्या भागावर सूज येऊ शकते. ही सूज चेहरा, सांधे , हात, पाय आणि डोळ्याखाली येऊ शकते. 

3 चक्कर येणे आणि अशक्तपणा
जेव्हा किडनीच्या कार्य पद्धतीत अडथळा येतो, तेव्हा आपल्याला सर्वात जास्त श्यक्यता चक्कर येण्याची असते. संपूर्ण वेळ आपण थकल्यासारखे आणि अशक्त असल्यासारखे असतो. ही लक्षणे रक्ताच्या कमतरतेमुळे आणि शरीरात घाण साचल्यामुळे उद्भवत असतात.

4 पाठ दुखीचे कारण 
आपल्या पाठीत आणि पोटात वेदना होणे हे किडनी मध्ये संसर्ग झाला असल्यासाचे, किंवा किडनीशी निगडित इतर आजारांचे संकेत असू शकतात.

5 त्वचा रुक्ष होणे आणि खाज येणे
त्वचेवर पुरळ उठणे, विचित्र वाटणे, जास्त प्रमाणात त्वचेवर खाज सुटणे असे आपल्या शरीरात घाण जमा झाल्यामुळे होऊ शकते. शरीरात मूत्रपिंडाच्या निकामी झाल्यामुळे शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमानाला अभाव होतो. या मुळे त्वचेवर अचानक खाज येते. सामान्यत: निरोगी त्वचा देखील फटू शकते आणि ती रुक्ष होऊन खाज सुटते.

6 थंडी वाजणे
चांगले हवामान असेल आणि तरी देखील थंडी वाटत असेल आणि थंडीसह ताप देखील येत असेल तर याची हि लक्षणे आहे. तापमान जास्त उष्ण असेल आणि तरीही थंडी वाजत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com