
Sankarshan Karhade Shares Post: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या खूप व्यस्त आहे. नियम व अटी लागू आणि तू म्हणशील तसं ही त्याची दोन नाटक एकाच वेळी सुरु आहेत. या नाटकांच्या अपडेट संकर्षण त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत असतो.
संकर्षणने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या हाताला बँडेज दिसत आहे. तर कानात माईक आहे. त्याच्या हा फोटो रंगमंचावरील आहे. नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्याने हा फोटो काढला असल्याचे दिसते. (Latest Entertainment News)
हा फोटो शेअर करत संकर्षणने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'परवा रात्री माझ्यावर ४ (चार) गुंडांनी हल्ला केला.. मी त्यांच्याशी २ (दोन) हात केले .. त्यात माझा १ (एक) हात जखमी झालाय.. ह्याची तुम्हाला ० (शुन्य) कल्पना होती म्हणुन हा फोटो पोस्ट करतोय..' या कॅप्शनमध्ये संकर्षणने दोन इमोजी देखील शेअर केले आहेत.
संकर्षणच्या या पोस्टवर अनेक कमेंट त्याचे चाहते करत आहेत. काहीजण त्याला काळजी घेण्यास सांगत आहेत तर काहीजण विनोदी कमेंट करत आहेत. 'गुंड बरे आहेत ना?', 'तुला मिळत असलेल यश बघवत नसेल ..काळजी घ्या !!', 'तुमचा एक हात जखमी करून घेतला त्यावरून वाटतंय की तुम्ही प्रतिकार करताना पण #नियमआणिअटी पालन केले असणारच', 'तुझी विनोदबुद्धी म्हणजे.... एक क्षण तर घाबरायलाचं झाले....काळजी घे'. अशा कमेंट नेटकरी करत आहेत.
संकर्षणने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्याने काही अंक लिहिले आहेत. या ४२१० या अंकांचा समावेश आहे. तसेच त्याने हसणारे ईमोजी पोस्ट केले आहेत. यावर स्पृहाची असलेली 'मस्त रे' कमेंटमुळे काही गंभीर झालेले नसून काहीतरी नवीन भेटीला येत असल्याची हिंट संकर्षण ला द्यायची आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
संकर्षण नुकताच ऑस्ट्रेलियाला गेला होता. तिथे त्याच्या 'तू म्हणशील तसं' या नाटकाचे प्रयोग होते. संकर्षण झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून घराघरात पोहचला' त्यांच्या समीर या व्यक्तिरेखेचं सर्वत्र कौतुक झाला. ही मालिका बंद झाली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.