Shreyas Talpade At Hutatma Chowk: तू आहेस म्हणून मी आहे… श्रेयस तळपदेने महाराष्ट्रदिनी व्यक्त केली भावना

Shreyas Talpade Celebrated Maharashtra Din: श्रेयसने हुतात्मा चौकातील त्याचे फोटो शेअर केले आहेत.
Shreyas Talpade Celebrated Maharashtra Din
Shreyas Talpade Celebrated Maharashtra DinInstagram @shreyastalpade27

Shreyas Talpade's Maharashtra Din Celebration: अभिनेता श्रेयस तळपदे याने नुकतीच त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. शेयसने मुंबईतील हुतात्मा चौक येथे महाराष्ट्र दिन साजरा केला आहे. यावेळी श्रेयस अगदी पारंपरिक वेशात दिसत होता. सफेद सदऱ्यावर पैठणीचे जॅकेट आणि धोतर श्रेयसने घातले होते.

श्रेयसने हुतात्मा चौकातील त्याचे फोटो शेअर केले आहेत. तसेच या फोटोला कॅप्शन दिले आहे, 'तूच माझी जन्मभूमी… तूच माझी कर्मभूमी… तू आहेस म्हणून मी आहे… मी महाराष्ट्राचा… महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.' श्रेयसने त्याच्या पोस्टच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्राचे त्याच्या प्रति असलेले महत्त्व सांगितले आहे.

श्रेयस तळपदेने बॉम्बे टाइम्स या वृत्तपत्राला मुलाखत देखील दिली. त्याने या मुलाखतीत सांगितले की, “महाराष्ट्र हे घर आहे. माझी संपूर्ण ओळख म्हणजे हे राज्य आहे,” एक महाराष्ट्रीयन म्हणून मला वाटते की ही अशी जागा आहे जी तुम्हाला हवे ते सर्व देईल. हुतात्मा चौकाच्या स्मारकात येणे हा मोठा सन्मान आहे. त्यांच्यामुळे (शहीद) आणि त्यांच्या बलिदानामुळे आपण हा दिवस पाहत आहोत आणि आपले एक स्थान आहे - महाराष्ट्र. (Latest Entertainment News)

Shreyas Talpade Celebrated Maharashtra Din
Salman Khan Interview: भाईजान सलमानला व्हायचयं बाबा, पण येतोय अडथळा

लहान असताना या ठिकाणाचे महत्त्व फारसे न माहीत नव्हते याची आठवण करूंन देत श्रेयस म्हणाला, "तुम्ही लहान असताना, तुम्ही तुमच्या स्वतःच्या विश्वात इतके गुंतलेले असता की तुम्ही या महत्त्वाच्या गोष्टींची फारशी दखल घेत नाही."

श्रेयस पुढे म्हणाला, “जस जसे तुम्ही मोठे होता तुम्हाला अशा दिवसांचे महत्त्व कळू लागते आणि त्याबद्दल आदर वाटू लागतो. त्यावेळेस, आमच्याकडे फोटो क्लिक करण्यासाठी स्मार्टफोन नव्हते, म्हणून यावेळी, मी फोटो काढण्यास त्यांच्या आठवणी बनविण्यास खूप उत्सुक आहे.

'इकबाल' (2005) मध्ये एक विशेष दिव्यांग क्रिकेटपटू म्हणून प्रकाशझोतात आलेल्या या श्रेयसने मुंबईला त्याला प्रेरणा देण्याचे, त्याला वाचवण्याचे आणि जीवनात दिशा आणि आशा निर्माण करण्याचे श्रेय दिले. मुंबईला घर म्हणत, त्याने शेअर केले, “जेव्हा मला संशयी मिळाली तेव्हा मुंबईनेच मला मदत केली ज्याने माझे आयुष्य बदलले, जसे प्रत्येक शुक्रवारी आपल्या चित्रपटसृष्टीत अभिनेत्याचे नशीब बदलते तसे.

शहराची चैतन्यशीलता तुम्हाला अशक्य गोष्टी साध्य करण्यासाठी विश्वास देते. मला वाटते की मुंबई तुमच्यासाठी ते सर्व करते. हे आशेचे शहर आहे; लोक इथे येतात आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करतात.

मी जगभर फिरलो आहे, पण जे फीलिंग मुंबई आहे ते कुठेही नाही. हे शहर सुरक्षित आहे आणि येथील लोक तुम्हाला जजकरत नाहीत, तुमच्यात भेदभाव करत नागीत. मला लोकांना सांगायचे आहे की त्यांनी शहराचा आदर करावा.

मुंबई अगर आप को इतना कुछ दे रहा है तो आपका भी फर्ज बनता है की आप भी इसको अच्छा दो, साफ रखो.” (मुंबई तुम्हाला इतकं काही देत आहेत तर तुमचे देखील कर्तव्य आहे की तुम्ही सुद्धा मुंबईला सुंदर आणि साफ ठेवाल.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com