Ashish Shelar On Marathi Natya Parishad Election: नाट्यपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपलं पॅनलला शेलारांचा पाठिंबा...

नाट्यपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रसाद कांबळींना तर शिंदेगटाकडून प्रशांत दामलेंना पाठिंबा मिळत आहे.
Ashish Shelar On Marathi Natya Parishad Election
Ashish Shelar On Marathi Natya Parishad ElectionSaam Tv

Marathi Natya Parishad Election: अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची नियामक मंडळाची (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad)  निवडणुक नुकतीच पार पडली. आता येत्या १६ मे ला नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणुक आणि इतर पदांसाठी निवडणुक होणार आहे.

नाट्यपरिषदेवर महाराष्ट्रभरातून निवडून आलेले ६० सदस्य अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत. या निवडणुकीत प्रसाद कांबळींच्या (Prasad Kambli) नेतृत्वाखाली आपलं पॅनल मैदानात आहेत तर दुसरीकडे प्रशांत दामलेंच्या (Prashant Damle) नेतृत्वाखाली पॅनल मैदानात आहे. प्रसाद कांबळी विरूध्द प्रशांत दामले यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस आहे.

Ashish Shelar On Marathi Natya Parishad Election
Preity Zinta At Shimla: प्रीती झिंटाला चुलीवरच्या जेवणाची भुरळ; माहेरच्यांसाठी बनवला खास मेन्यू

जसजशी निवडणुक जवळ येतंय तसतसं नाट्यपरिषदेच्या निवडणुकीतही राजकारण रंगू लागलंय. प्रशांत दामलेंनी अध्यक्षपद सोडून इतर पदांवर उभे केलेले उमेदवार हे इतर पक्षाशी नाळ असणारी मंडळी आहेत. प्रशांत दामलेंच्या पॅनलला सध्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री उदय सामंत यांचा वरदहस्त असून नाट्यपरिषदेच्या निवडणुकीसाठी गेले वर्षभर ते प्रयत्न करत आहेत. नाट्यपरिषदेच्या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या पॅनलसाठी उदय सामंत हे स्वतः राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बरोबर घेत चांगलंच पाठबळ निर्माण केलं व आपले सदस्य निवडून आणण्यासाठी उदय सामंत यांनी जंग जंग पछाडलं होतं. त्यामुळे या निवडणुकीला एक राजकीय रंग निर्माण झाला. रंगभूमीचा विकास सोडून नाट्यपरिषदेत राजकारण आणायचा या पॅनलचा मनोदय आहे.

Ashish Shelar On Marathi Natya Parishad Election
Dharmaveer Part 2 Announced: "दिघे साहेब"... असेच कायम पाठीशी रहा, अभिनेता प्रसाद ओकने खास पोस्ट करत केली नव्या चित्रपटाची घोषणा

तर दुसरीकडे प्रसाद कांबळी ह्यांचे आपलं पॅनल आहे ज्या पॅनेल मध्ये रंगभूमीवर कार्यरत असलेले नाट्यकर्मी, बॅकस्टेज आर्टिस्ट आणि रंगभूमीशी जवळीक असणारी माणसे आहेत . ज्यांना खरंच रंगभूमीसाठी योगदान द्यायचं आहे. नाट्यपरिषदेच्या निवडणुकीत होत असलेल्या या राजकारणाविषयी मुंबई भाजपचे अध्यक्ष व वरिष्ठ नेते आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने प्रसाद कांबळींना बोलवून या संपूर्ण निवडणूकीविषयी आणि होणाऱ्या चुकीच्या गोष्टींविषयी माहिती घेतली. आणि सरतेशेवटी 16 मेला होणाऱ्या नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रसाद कांबळींच्या आपलं पॅनलला आपला पाठिंबा जाहिर केला.

मराठी रंगभूमी हा आपला एक सांस्कृतिक ठेवा आहे. आणि रंगभूमी आणि रंगकर्मींचा विकास होण्यासाठी राजकारणविरहीत वातावरण आणि चांगल्या माणसांची आवश्यकता असल्याने मी प्रसाद कांबळींना मराठी रंगभूमीचा एक चाहता म्हणून आपला पाठिंबा दर्शवतो आहे. भाजप हा पक्ष नेहमीच प्रत्येक गोष्टीत चांगल्या माणसांच्या पाठी नेहमीच भक्कम उभा राहतो त्यामुळे आपण प्रसाद कांबळी आणि त्याच्या पॅनलला साथ देत आहोत अशी भावना आशिष शेलार यांनी व्यक्त केली. प्रसाद कांबळींच्या मागे आशिष शेलार यांची साथ मिळाल्याने प्रसाद कांबळींचं आपलं पॅनलचं पारडं अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भक्कम झाले आहे.

Ashish Shelar On Marathi Natya Parishad Election
Japani Dancer Madhumas Baharla Dance: परदेशात पुन्हा एकदा बहरला मधुमास; जपानी कलाकारालाही मोह आवरला नाही, व्हिडीओ तुफान व्हायरल...

या निवडणुकीत आपलं पॅनलतर्फे प्रसाद कांबळी, अविनाश नारकर, जगन्नाथ (नाथा) चितळे, अजय दासरी, सुकन्या कुलकर्णी - मोने, ऐश्वर्या नारकर, गीतांजली ठाकरे, गीताबाली उनवणे आदी रंगकर्मी या निवडणुकीत निवडणूक लढवीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com