
Anant-Radhika Get Engaged In A Tradition Way: रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंड यांची कन्या राधिका मर्चंड यांचा गुरुवारी (१९ जानेवारी) साखरपुडा पार पडला. २९ डिसेंबरला अनंत आणि राधिका यांचा रोका झाला होता. तेव्हा अनंत आणि राधिकाच्या रोका समारंभाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. अनंत आणि राधिका यांचा रोका राजस्थानातील श्रीनाथजी मंदिरात पार पडला होता.
अनंत आणि राधिका एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतात. अंबानी कुटुंबाच्या अनेक कार्यक्रमात राधिकाला आपण पहिले आहे. राधिका मर्चंट ही एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. राधिकाचे वडील वीरेन यांचीही गणना देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते.
राधिकाचे शालेय शिक्षण मुंबईत झाले आहे. यानंतर पुढील शिक्षणासाठी न्यूयॉर्कला गेली होती. न्यूयॉर्कला राधिकाने राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला. 2017 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, राधिका इसप्रावामध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झाला. तिला वाचन, ट्रॅकिंग आणि स्विमिंगची आवड आहे.
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. 2018 मध्ये दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये राधिका हिरव्या कपड्यांमध्ये दिसत होती. राधिक एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना देखील आहे.
गुजराती हिंदू कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गुड धाना आणि चुनरी विधी यांसारख्या शतकानुशतके जुन्या परंपरा कार्यक्रमस्थळी आणि कौटुंबिक मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडल्या. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना भेटवस्तू दिल्या. नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली अंबानी कुटुंबातील सदस्यांनी केलेले नृत्य हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.
गुड धानाचा शाब्दिक अर्थ आहे - गूळ आणि धणे. गुड धाना हा गुजराती परंपरेनुसार लग्नाआधीचा सोहळा आहे. कार्यक्रमादरम्यान या वस्तू वराच्या घरी पाठविल्या जातात. वधूचे कुटुंब वराच्या घरी भेटवस्तू आणि मिठाई घेऊन जातात आणि नंतर वर आणि वधू एकमेकांना अंगठी घालतात. यानंतर जोडपे वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतात.
अनंतची बहीण ईशा आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी संध्याकाळी राधिकाला तिच्या मर्चंड निवासस्थानी जाऊन आमंत्रण दिले. यानंतर, अंबानी कुटुंबाने वधू पक्षाचे त्यांच्या निवासस्थानी आरती आणि मंत्रोच्चारात स्वागत केले. संपूर्ण कुटुंब अनंत आणि राधिका या जोडप्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी भगवान कृष्णाचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात गेले.
तेथून सर्वजण गणेश पूजनाच्या ठिकाणी गेले. त्यानंतर पारंपरिक लग्न पत्रिका पठण झाले. गुड धाना आणि चुनरी समारंभानंतर अनंत आणि राधिकाच्या कुटुंबियांमध्ये भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली .
बहीण ईशाने रिंग सेरेमनी सुरू झाल्याची घोषणा केली. अनंत आणि राधिका यांनी कुटुंबीय आणि मित्रांसमोर एकमेकांना अंगठी घातली तसेच सर्वांचे आशीर्वाद घेतले. अनंत आणि राधिका गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. त्याच्या साखरपुड्यामुळे दोघेही आणखी त्यांना जवळ येतील, असे कुटुंबाकडून सांगण्यात आले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.