AR Rahman Viral Video: तामिळमध्ये बोल... एआर रहमाननी पत्नीला भर मंचावर हटकले, व्हिडिओ व्हायरल

AR Rahman Told Wife To Speak In Tamil: रहमान त्यांच्या पत्निला हिंदीत नाहीत तर तामिळमध्ये बोल असे सांगत आहेत.
A R Rahman Told Wife To Not Speak in Hindi
A R Rahman Told Wife To Not Speak in Hindi Saam Tv

AR Rahman's Tamil Love Video Went Viral: ऑस्कर विजेते संगीतकार एआर रहमान यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एआर रहमान त्यांच्या पत्नीला हिंदीत नाही तर तामिळमध्ये बोलण्यास सांगत आहे. व्हिडिओमध्ये संगीतकार एआर रहमान पत्नी सायरासोबत पुरस्कार स्वीकारताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये एआर रहमान त्यांची पत्नी सायरा त्यांची मुलाखत किती वेळा पाहते, हे सांगितले आहे.

संगीतकार एआर रहमान हे संगीत विश्वातील एक मपोथे प्रस्थ आहेत. त्यांना अनेक बड्या पुरस्करांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारने देखील सन्मानित करण्यात आले आहे. या दिग्गज व्यक्तीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये एआर रहमान यांच्यासोबत त्यांची पत्नी सायरा देखील दिसत आहेत. त्यांच्या पत्नीच्या हातात अवॉर्ड आहे. रहमान त्यांच्या पत्निला हिंदीत नाहीत तर तामिळमध्ये बोल असे सांगत आहेत.

A R Rahman Told Wife To Not Speak in Hindi
Jiah Khan Case: तब्बल १० वर्षांनी जिया खान प्रकरणाचा निकाल लागणार

तसेच यादी त्यांनी त्यांच्या पत्नीला त्यांची मुलाखत बघयाला आवडते हे देखील सांगितले आहे. दरम्यान एआर रहमान त्यांनी सांगितले की, 'मला माझी मुलाखत पुन्हा बघायला आवडत नाही. ती माझ्या मुलाखती पुन्हा पुन्हा पाहत राहते कारण तिला माझा आवाज खूप आवडतो. त्यावर तिच्या प्रतिक्रियेसाठी ते तिच्याकडे माईक देतात. तसेच सायरा बानो यांना हिंदीत नाही तर मराठी बोल असे सांगतात.

तमिळ नीट जमत नसल्याबद्दल सायरा इंग्रजीत बोलण्यास सुरूवात करतात, 'सर्वांना गूड एव्हइनींग, मी सर्वात आधी माफी मागू इच्छिते, मला तमिळमध्ये नीट बोलता येत नाही. म्हणून मला क्षमा करा. मी खूप आनंदी आणि उत्साहित आहे कारण त्यांचा आवाज मला खूप आवडतो. मी त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडले. मी एवढेच सांगू शकतो.'

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की ए आर रहमान यांना पुरस्कार दिला जात आहे.मंचावर रहमान यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील आहे. काही दिवसांपूर्वीच चेन्नईतील एका पुरस्कार सोहळ्यात,'पोन्नियन सेल्वन'च्या या संगीतकारानं पत्नी सायरा बानो हिला 'हिंदीत नको,तामिळमध्ये बोल' असे सांगितले. (Latest Entertainment News)

काही दिवसांपूर्वीच रहमान यांनी पत्नी सायरा बानोसोबत एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. हा तामिळ पुरस्कार सोहळा होता जिथे निवेदकानं रहमान यांची पत्नी सायरा बानो यांना मंचावर बोलावून दोन शब्द बोलण्यास सांगितले.

रहमान यांच्या पत्नीनं हातात माइक पकडताच त्यांनी तिला तामिळमध्ये बोलण्यास सांगितले. ते म्हणाले,''हिंदीत बोलू नकोस,तामिळमध्ये बोल''. अर्थात एवढं बोलूनही सायरा तामिळमध्ये बोलल्या नाहीत. ज्याच्यासाठी त्यांनी उपस्थितांची माफी मागितली.एआर रहमान नेहमीच तमिळची गुणगान गात असतात. याआधीही एका अवॉर्ड फंक्शनमध्ये हिंदी बोलल्याने ते स्टेज सोडून गेले होते.

एआर रहमान आणि सायरा बानो यांचा विवाह 1995 मध्ये झाला होता. आता दोघांना खतिजा, रहिमा आणि अमीन ही तीन मुले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com