Asur 2 First Look: नेमका हा ‘असुर’ कोण? अर्शद वारसी आणि बरुण सोबतीच्या ‘असुर २’चा फर्स्ट लूक प्रदर्शित, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

Asur 2 Release Date Declared: अर्शद वारसी आणि बरुण सोबती यांच्या ‘असुर’ या वेबसीरिजच्या पहिल्या भागाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर वेबसीरिजच्या सिक्वेलचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.
Asur 2 Declared Release Date And First Look
Asur 2 Declared Release Date And First LookSaam Tv

Asur 2 Promo: अर्शद वारसी आणि बरुण सोबती मुख्य भूमिकेत असलेल्या ‘असुर’ या वेबसीरिजने प्रेक्षकांचे लॉकडाऊनच्या काळात बरेच मनोरंजन केले. पहिल्या भागाला दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या वेबसीरिजचा दुसरा भाग ‘असुर २’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘असुर २’ प्रेक्षकांसाठी गूढ, पौराणिक कथा आणि साहसी कथा असा आशय घेऊन परतत आहे. ‘असुर’ वेबसीरिजचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांना पहायला मिळणार असून अद्याप याचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.

Asur 2 Declared Release Date And First Look
Famous Producer Dies : प्रसिद्ध निर्मात्याचा संशयास्पद मृत्यू; हॉटेलचे दार उघडताच दिसलं भयंकर दृश्य

लॉकडाऊनमध्ये प्रदर्शित झालेल्या या वेबसीरिजची कमालीची चर्चा झाली होती. अनेकदा निर्मात्यांसह दिग्दर्शकांना प्रेक्षकांनी चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार हा प्रश्न विचारला होता. अखेर प्रेक्षकांना याचं उत्तर मिळालं असून ‘असुर २’ ही वेबसीरिज ‘जिओ सिनेमा’ वर प्रदर्शित होत असून येत्या १ जून पासून प्रेक्षकांना दुसरा सीझन पाहायला मिळणार आहे. सायको थ्रिलरची कथा असणाऱ्या या वेबसीरिजचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला.

‘असुर २’च्या फर्स्ट लूकमध्ये अर्शद वारसी असूराला पकडण्यासाठी तो आतोनात प्रयत्न करताना दिसत आहे. हा असुर तोच आहे, जो सीरियल किलर बनून निरपराध लोकांची जीव घेत आहे. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये फॉरेन्सिक एक्स्पर्टची भूमिका साकारणारा बरुण सोबती आणि सीबीआय अधिकाऱ्याची भूमिका साकारणारा अर्शद वारसी आणि असुर यांच्यातील त्यांच्यातील वाद पाहायला मिळणार आहेत. भयानक वळणावर आलेल्या या वेबसीरिजमध्ये एका असुराची एन्ट्री होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हा नेमका असुर कोण आणि याला शोधण्यात अर्शद वारसी आणि बरुण सोबती यांना यश मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Asur 2 Declared Release Date And First Look
Munawwar Rana Hospitalize: मुनव्वर राणा यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात उपचार सुरू...

‘असुर’चा हा दुसरा सीझन जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १ जूनपासून मोफत बघायला मिळणार आहे. या नव्या सीझनमध्ये बरुण सोबती, अर्शद वारसी, रिद्धी डोग्रा, अनुप्रिया गोएंका, अमेय वाघ हे कलाकार पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. प्रेक्षकांना हा फर्स्ट लूक आवडला असून ते याच्या सीझन २ ची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com