Pooja Hegde On Salman Khan Dating: सलमान- पूजाचं नेमकं नात काय? पूजाने तब्बल ७ वर्षांनंतर सोडलं मौन...

Pooja Hegade And Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे रियल लाईफमध्ये एकमेकांना डेट करत असल्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
Pooja Hegde On Salman Khan Dating
Pooja Hegde On Salman Khan DatingSaam Tv

Pooja Hegde On Salman Khan Dating: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे सध्या ‘किसी की भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात दोघांनीही रोमान्स केला असून त्यामुळे सलमान बराच ट्रोल देखील झाला होता. तर दुसरीकडे ही जोडी त्यांच्या रियल लाईफमध्ये एकमेकांना डेट करत असल्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

नुकतच या चित्रपटाच्या टीमने द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान पुजा हेगडे आणि सलमान खान हे दोघ डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र या सर्व केवळ अफवा असल्याचा खुलासा पुजानं एका मुलाखतीत केला.

Pooja Hegde On Salman Khan Dating
Boys Arrested In Pune: पुणे विद्यापीठात रॅप साँग करणं पडलं महागात

पुजानं नुकतेच एका वृत्त संस्थेला मुलाखत दिली, यामध्ये तिने तिच्या आणि सलमान खानच्या अफेअरच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली. यावर पुजाने सांगितले, “ आता मी काय बोलू. मी देखील त्या अफवा पसरणाऱ्या माझ्याबद्दलच्या बातम्या वाचल्या आहेत. पण तसं काही नाही. माझं स्वतःवर प्रेम आहे. सध्या माझं दुसरे कुठेच लक्ष नाही, मला सध्या तरी,माझ्या करियरकडेच लक्ष द्यायचे आहे. मला एका शहरातून दुसऱ्या शहरात काम करायचे आहे. अशा अफवांवर मी काहीही बोलणार नाही. कारण ते केवळ बिनबूडाच्या अफवा आहेत.”

Pooja Hegde On Salman Khan Dating
Raavrambha Music Launch: रंगमंचावर अवतरला शिवकाळ; रावरंभाच्या म्युझिक लाँचिंग सोहळ्याला ऐतिहासिक स्वरूप

यावेळी मुलाखतीत पूजाने सलमानसोबत काम करण्याचा देखील अनुभव शेअर केला आहे. “लॉकडाऊनपूर्वी हा चित्रपट मला निर्मात्यांनी ऑफर केला होता. त्यावेळी त्या चित्रपटाचं नाव वेगळं होतं. साजिद नाडियादवाला देखील या चित्रपटाचा एक भाग होते. मी यापूर्वीही त्याच्यासोबत काम केले आहे.”

पुढे पुजा म्हणते, “सलमान सरांनी माझं २०१६ मधील ‘मोहनजोदडो’ या चित्रपटातील काम पाहून मला म्हणाले की, आपण एकत्र काम करूया. इतक्या मोठ्या सेलिब्रिटीसोबत मला काम करण्याची संधी मिळत आहे, हे पाहून मी स्वत:ला रोखू शकली नाही. ही ऑफर माझ्यासाठी खूप चांगली आहे. या चित्रपटात मी तेलुगू मुलीचे पात्र साकारत असल्याने माझ्यासाठी थोडं काम सोप्प होतं.”

Pooja Hegde On Salman Khan Dating
Nysa Devgan's Viral Video: आता माझी सटकली, चुकीचं नाव घेतल्याने सिंघमची मुलगी संतापली

‘किसी की भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान आणि पूजा ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. सलमान- पूजासोबत या चित्रपटात प्रमुख भूमिकेत व्यंकटेश दग्गुबती, सिद्धार्थ निगम, शहनाज गिल, पलक तिवारी, भूमिका चावला, राघव जुयाल आणि विनाली भटनागर हे कलाकारही दिसणार आहेत. फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी की भाई किसी की जान’ हा चित्रपट येत्या २१ एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com