'Fast X' Box Office Collection: 'फास्ट अँड फ्युरियस 10'ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी; तीन दिवसात केली कोट्यवधींची कमाई

Box office Collection: हॉलीवूडच्या 'फास्ट अँड फ्युरियस' फ्रँचायझीच्या या 10व्या भागाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
Fast X Box Office Collection
Fast X Box Office CollectionInstagram @fastandfuriousde

Hollywood Movie Collection In India: हॉलिवूडचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'फास्ट अँड फ्युरियस 10' 18 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. विन डिझेलच्या या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. हॉलीवूडच्या 'फास्ट अँड फ्युरियस' फ्रँचायझीच्या या 10व्या भागाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'फास्ट एक्स'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन वेगाने पुढे जात आहे.

पहिल्या दिवशी, फास्ट एक्सने बॉक्स ऑफिसवर देशभरात सुमारे 12.50 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाची भारतीय प्रेक्षक आणि चाहत्यांच्या खूप कालापासून प्रतीक्षा करत होते. तिसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या शनिवारी या चित्रपटाच्या कमाईत मोठी उडी घेतली.

शनिवारी 'फास्ट अँड फ्युरियस एक्स'च्या कमाईत 20% वाढ झाली. तिसर्‍या दिवशी (पहिल्या शनिवारी) म्हणजे २० मे रोजी फास्ट एक्सने किती गल्ला जमवला, चला जाणून घेऊया. (Latest Entertainment News)

Fast X Box Office Collection
Mukta Barve On Theaters Condition: चारचौघीच्या कलाकारांचा नवीन व्हिडिओ आला समोर, विष्णुदास भावे नाट्यगृह दाखवत म्हणाले..

'boxofficeindia.com' नुसार, 'Fast and Furious X' ने तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 17 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवसाची कमाई 13 कोटी रुपये होती. हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून त्याचे कलेक्शन वाढतच गेले आहे.

या चित्रपटाचे आतापर्यंत 43.25 कोटी रुपयांचे कलेक्शन झाले आहे. 'फास्ट एक्स' 60 कोटींचा टप्पा सहज पार करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. असे झाल्यास, त्याच फ्रेंचायझीच्या 'फास्ट अँड फ्युरियस 7' या चित्रपटाचा विक्रम मोडेल, ज्याने चार दिवसांत 46 कोटींची कमाई केली.

जर 'पठाण' आणि 'किसी का भाई किसी की जान' हे चित्रपट सोडले तर, 'फास्ट अँड फ्युरियस 10' चे तीन दिवसांचे कलेक्शन इतर सर्व हिंदी चित्रपटांपेक्षा चांगले आहे.

फास्ट एक्समध्ये विन डिझेल, जॉन सीना, जेसन मोमोआ, जेसन स्टॅथम, टायरेस गिब्सन आणि मिशेल रॉड्रिग्ज हे स्टार आहेत. बॉक्स ऑफिसवर 'फास्ट एक्स'च्या हा चित्रपट भारतातील 'फास्ट अँड फ्युरियस' फ्रँचायझीचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरणार आहे.

मात्र, सोमवार म्हणजेच २२ मे हा चित्रपट हिट होण्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. लाँग वीकेंडमुळे चित्रपट हाऊसफुल्ल होऊ शकतो. 'फास्ट एक्स'च्या कलेक्शनमध्ये फारशी घट नसल्याने वीकेंडला त्याचा फायदा होईल. मग चित्रपटाची 100 कोटींहून अधिक कमाई सहज होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com