Sharad Ponkshe On The Kerala Story: आपल्या मुलींना फसवलं जातं... 'द केरला स्टोरी' चित्रपट पाहिल्यानंतर शरद पोंक्षेंचे हिंदूंना आवाहन

The Kerala Story: शरद पोंक्षे यांनी चित्रपट पाहिल्यानंतर अस्वस्थ होत त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
Sharad Ponkshe On The Kerala Story
Sharad Ponkshe On The Kerala StorySaam TV

Hindu Should Watch The Kerala Story Said Sharad Ponkshe: 'द केरला स्टोरी' या चित्रपटावरून दक्षिण भारतात अनेक वाद सुरु आहेत. दक्षिण भारतात अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले आहेत. या चित्रपटाचा विषय खूपच वेगळा आहे. 'लव्ह जिहाद' सारख्या विषयावर बनविण्यात आलेल्या या चित्रपटामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांचे आणि दिग्दर्शकाचे कौतुक देखील होत आहे.

समाजातील काही भाग या चित्रपटाला विरोध करत असताना काहीजण या चित्रपटाला समर्थन देत आहेत. अभिनेते शरद पोंक्षे यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया देणार व्हिडिओ शेअर केली आहे. शरद पोंक्षे यांनी चित्रपट पाहिल्यानंतर अस्वस्थ होत त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

शरद पोंक्षे या व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत, ''नमस्कार, मी शरद पोंक्षे.. आज मी तुमच्या समोर आलोय त्याचं कारणही तसंच आहे.. कारण काल रात्री मी द केरळ स्टोरी हा चित्रपट पाहिला आणि प्रचंड अस्वस्थ झालो.. मी रात्रभर झोपू शकलो नाही.. '' (Latest Entertainment News)

Sharad Ponkshe On The Kerala Story
Uorfi Javed Post For GEA 2023: माधुरी दीक्षितमुळे ऐनवेळी उर्फीला इव्हेंटमधून बाहेर काढले; पोस्ट शेअर करत व्यक्त केला संताप

''म्हणून मी सर्व हिंदुस्तानी बंधूना आणि भगिनींना विनंती करतो की हा चित्रपट तुम्ही चित्रपट गृहात जाऊन बघा. मी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांचे आभार मानतो की त्यांनी इतका महत्त्वाचा, संवेदनशील आणि धाडसी विषय हाताळला.''

''या चित्रपट पाहून मी विचार केला की हे आपल्याच बाबतीत का होतं. हिंदू मुलींना लव्ह जिहादमध्ये कसं अडकवलं जातं आणि त्या कशा अडकतात.. तर त्याचं कारण आहे की आपल्याला आपली संस्कृती माहीत नाही, परंपरा माहीत नाही.''

''आपल्या देवांची माहिती नाही, त्याची उत्पत्ती माहीत नाही. एखाद्या देवाला हेच वाहन का हेही माहीत नसतं. कारण आपण आपल्या मुलांना सांगत नाही. आपण मॉडर्न होण्याच्या नादात आपल्या मुलांना आपलीच संस्कृती शिकवली नाही. म्हणूनच ते आपल्या हिंदू मुलींना जाळ्यात ओढतात आणि त्यांना फसवतात.''

''आणि प्रेम ही अशी गोष्ट आहे, जिथे कुणीच काही बोलू शकत नाही. आपल्या मुलींना फसवलं जातं. म्हणून मी आवाहन करतो, की प्रत्येक हिंदू कुटुंबाने, तरुण मुलींनी हा चित्रपट पाहा. याला काही पक्ष विरोध करत आहेत, पण त्याकडे लक्ष देऊ नका.. हा चित्रपट जाऊन बघा म्हणजे कळेल किती भयानक वास्तव आहे.

''काही पक्ष हा चित्रपट खोटा आहे म्हणून ओरडतायत.. पण जोपर्यंत आपल्या घरात आग लागत नाही तोवर हे कळत नाही. जेव्हा तुमच्या मुलींना असं फसवलं जाईल तेव्हा तुमचे डोळे उघडणार आहेत का? त्यामुळे मी विनंती करतो.. या जिहाद पासून आपल्या मुलींना वाचवायचं असेल तर कृपया हा चित्रपट पाहा.. कारण वेळ निघून गेली तर आपल्या हातात काहीच उरणार नाही.. त्यामुळे सावध व्हा..''अशी पोस्ट शरद पोंक्षे यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com