Dance Video : हळदीत बेभान होऊन नाचले राणादा-पाठकबाई, भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल

एकीकडे अक्षयाच्या मेंहदी सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच, आता दोघांच्या हळदीचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Akshaya Deodhar, Hardeek Joshi Wedding Dance Video
Akshaya Deodhar, Hardeek Joshi Wedding Dance VideoSaam TV

Akshaya Deodhar, Hardeek Joshi Wedding : कलाविश्वातील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांची यांची लगीन घटिका समीप आली आहे. हार्दिक आणि अक्षयाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. एकीकडे अक्षयाच्या मेंहदी सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच, आता दोघांच्या हळदीचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

Akshaya Deodhar, Hardeek Joshi Wedding Dance Video
Hardik Akshaya Wedding : नवरी नटली! पाठकबाईंचा थाट पाहिलात का?

या व्हिडीओत एकमेकांच्या प्रेमात रंगलेल्या हार्दिक अक्षया भन्नाट डान्स (Dance Video) करताना दिसून येत आहे. नुकताच हार्दिक-अक्षयाचा हळदी समारंभाचा कार्यक्रम पार पडला. या समारंभासाठी खास पिवळ्या फुलांनी डेकोरेशन करण्यात आलं होतं. हळदीसाठी अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीने पांढऱ्या रंगाचा पेहराव केला होता.

हळदीच्या कार्यक्रमात दोघांचेही मित्रपरिवार तसेच कुटुंबीय अगदी बेभान होऊन नाचले. मित्रपरिवाराने हार्दिक-अक्षयाला उचलून घेत डान्स (Viral Video) करायला भाग पाडलं. अक्षया-हार्दिकच्या डान्सने हळदी समारंभात चार चांद लावले. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘राणादा-पाठकबाई’ ही ऑन स्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात २ डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. दोघांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com