Harman Baweja On Relationship With Priyanka: १५ वर्षांनी अभिनेता हरमन बावेजाने प्रियांका चोप्रासोबतच्या नात्यावर सोडले मौन

Harman Baweja on Priyanka Chopra Rumours: प्रियांका आणि हरमन यांच्यात काहीतरी वाद सुरू असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली होती.
Harman Baweja-Priyanka Chopra Relationship Rumoured
Harman Baweja-Priyanka Chopra Relationship Rumoured Saam TV

Harman Baweja-Priyanka Chopra Relationship: लव्ह स्टोरी 2050, 'ढिश्कियाऊं, विक्ट्री या चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता हरमन बावेजा सिनेसृष्टीपासून बरीच वर्ष दूर आहे. परंतु लवकरच अभिनेता OTTवर पदार्पण करणार आहे. पण सध्या हरमन बावेजा वेगळाच कारणांमुळे चर्चेत आहे. त्याचे प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे कारण केवळ अभिनेत्याचे पुनरागमन नाही तर त्याने केलेले खुलासेही आहेत.

यापूर्वी एका मुलाखतीत हरमनने इतकी वर्षे इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचे कारण सांगितले होते, आता नुकतेच अभिनेत्याने त्याच्या आणि प्रियांकाच्या कथित नात्यावर मौन सोडले आहे.

हरमन बावेजाचे हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पण प्रभावी नव्हते. अभिनेत्याचा पहिला चित्रपट, 'लव्ह स्टोरी 2050', ज्यामध्ये त्याने प्रियांका चोप्राच्या विरुद्ध भूमिका साकारली होती, तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. हा चित्रपट फ्लॉप असल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे प्रियांका आणि हरमन यांच्यात काहीतरी वाद सुरू असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली होती.

Harman Baweja-Priyanka Chopra Relationship Rumoured
Priyanka Chopra Makes Shocking Claim: त्यांनी मला अंतर्वस्त्रे दाखवायला सांगितली ... २१ वर्षांनंतर प्रियांका चोप्राचा धक्कादायक खुलासा

त्यावेळी दोन्ही कलाकारांनी या अफवांवर मौन बाळगले होते. पण आता 15 वर्षांनंतर हरमन बावेजाने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत या नात्याबद्दल खुलासा केला. हरमन बावेजा म्हणाले की, टॅब्लॉइड मीडियाशी व्यवहार करणे हा बॉलिवूडचा एक भाग आहे.

अभिनेत्याने एका मीडिया आउटलेटला सांगितले की, "तुम्ही एक चित्रपट केला असेल किंवा दुसरा चित्रपट साईन केला असेल किंवा चित्रपटाच्या सेटवर तुम्ही कठोर परिश्रम केले आणि जखमी झाला असाल तर मीडियाला या बातम्यांमध्ये खरोखर रस नाही.

पण जर कोणी तुम्हाला एका रेस्टॉरंटच्या बाहेर दिसलं आणि तीन मिनिटांनंतर एखादी मुलगी त्याच रेस्टॉरंटमधून बाहेर पडली आणि वृत्तपत्रांना वाटतं की तुम्ही त्या मुलीसोबत डिनर करत आहात, खरं तर तुम्ही असं काही करत नसता.

'लव्ह स्टोरी 2050' मध्‍ये अभिनेत्या;अभिनेत्याला पाहताच त्‍याच्‍या लूक आणि डान्‍सच्‍या मूव्‍हची सतत हृतिक रोशनशी तुलना केली जात होती, त्‍याच्‍यासोबतच त्‍याच्‍या रिलेशनशीपच्‍या बातम्याही समोर येत होत्या.

Harman Baweja-Priyanka Chopra Relationship Rumoured
The Kerala Story Released In West Bengal: अखेर पश्चिम बंगालमध्ये 'द केरला स्टोरी' प्रदर्शित; कोर्टाच्या निर्णयानंतर निर्मात्यांना दिलासा

हरमन बावेजा पुढे म्हणाला, 'जेव्हा असं काही असतं तेव्हा ते गोड वाटतं पण जेव्हा काही नसतं तेव्हा ते खूप कडू वाटतं. परंतु हा त्या क्षेत्राचा एक भाग आहे आणि तुम्ही ते नाकारू शकत नाही. हरमन बावेजाने प्रियांका चोप्रासोबतच्या त्याच्या नात्याच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत आणि त्या केवळ अफवा असल्याचे देखील म्हटले आहे. (Latest Entertainment News)

हरमन बावेजा हा लोकप्रिय चित्रपट निर्माता हॅरी बावेजा यांचा मुलगा आहे. अभिनेता अनीस बज्मीच्या इट्स माय लाइफमध्ये शेवटचा काम करताना दिसला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर झी सिनेमावर प्रदर्शित झाला.

हरमन बावेजा लवकरच 'स्कूप' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. त्याच्याशिवाय करिश्मा तन्ना, प्रोसेनजीत चॅटर्जी, मोहम्मद जीशान अय्युब, देवेन भोजानी आणि तन्निष्ठ चॅटर्जी यांच्या या वेबसीरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 'स्कूप' 2 जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रीमियर होईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com