Hemangi Kavi Post: हेमांगी कवी अखेर २ वर्षांनंतर उघडपणे बोलली; ‘बाई...ब्रा..' पोस्टमागील खरं कारण सांगितलं

Hemangi Kavi on Racism: हेमांगीने नुकतेच एका मुलाखतीत काही सासरच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. तिला सासूबाई कशा सपोर्ट करायच्या आणि कशा सांभाळून घ्यायच्या याबद्दल सांगितले.
Hemangi Kavi Social Media Post
Hemangi Kavi Social Media PostInstagram

Hemangi Kavi Social Media Post: हेमांगी कवी नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. अनेक विविध भूमिका साकारत मराठी सिनेसृष्टीत हेमांगीने आपले स्थान पक्के केले आहे. अभिनय आणि नृत्यांगना म्हणून चर्चेत आलेली हेमांगीने नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांचे मन जिंकले. सध्या सोशल मीडियावर हेमांगीची सध्या मुलाखत बरीच चर्चेत आली आहे. हेमांगीने दिलेल्या मुलाखतीत काही सासरच्या काही गोष्टी शेअर केल्या आहे. तिला सासूबाई कशा सपोर्ट करायच्या आणि कशा सांभाळून घ्यायच्या याविषयावर मुलाखतीत सांगितलं.

Hemangi Kavi Social Media Post
Prajakta Mali: प्राजक्ताला चक्क सलमानसोबत करायचंय लग्न?; प्राजुच्या वक्तव्याने चर्चांना उधाण...

हेमांगीने नुकतंच प्लॅनेट मराठीवरील एका पॉडकास्टसाठी मुलाखत दिली होती. यावेळी तिने तिच्या घरातल्या काही गोष्टींवर दिलखुलास वक्तव्य केलं आहे. यावेळी हेमांगीला ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ ही पोस्ट का टाकली, त्यामागे नेमकं कारण काय होतं? असा प्रश्न तिला विचारला. त्या प्रश्नाला जवळपास दोन वर्षांनंतर तिने स्पष्टपणे उत्तर दिले.

“मी एक व्हिडीओ टाकला होता, ज्यात मी चपात्या करत होते. त्या व्हिडीओवर एका बाईने कमेंट केली होती. ज्यात तिने मला ‘बाई तुला कळत नाही का, की तू पोळ्या लाटतेस… पण त्यात ते दिसतंय वैगरे…’ असं तिने अनेक गोष्टींवर भाष्य केले होत. त्यावर मी म्हणाले, “तू स्वत: एक बाई आहेस, तुला स्वत:ला या गोष्टींचा त्रास होतो आणि तू मला अक्कल शिकवतेस.” त्यावर त्या बाईने “तुला पोस्ट करायच्या आधी ते कळायला हवं”, असं म्हटलं. त्याच्यावर पुढे मी म्हणाले, “मी माझ्या घरात आहे.” त्यावर तिने तू घरात असलीस तरी तुला याचं भान ठेवायला हवं, असे म्हटलं. (Latest Marathi News)

Hemangi Kavi Social Media Post
Why did Raghu-Rama Leave Roadies: रघु - रामने स्पष्ट केले ‘रोडिज’ सोडण्याचे कारण; शो बद्दल केली मोठी पोलखोल

“जेव्हा एखादा पुरुष पांढऱ्या रंगाचे कपडे घालून भिजतो, त्यावेळी तो बघतो का की माझं काही दिसतंय का, तो पोस्ट करुन मोकळा होतो ना… त्यावर त्या बाईने नाही नाही, तो पुरुष आहे. त्यावर मी हाच माझा मुद्दा आहे.” असं म्हणतं तिला फटकारलं.

“मला जसं जगायचं, तसं जगू द्या, तुम्हाला माझ्याबद्दल काय ठरवायचं ते ठरवा, पण हा तुमचा प्रॉब्लेम आहे. पण तुला अक्कल नाही, तुझ्यावर संस्कार नाही. तुझं शिक्षण नाही” या एका गोष्टीमुळे बोल लावू नका.

आपण मुलांच्या सर्व गोष्टींवर दुर्लक्ष करतो, पण मुलींच्या गोष्टींवर का केलं जात नाही. तेव्हा मला या गोष्टी जाणवल्या. पुरुष हा संस्कृतीकारक आहे, बायका या संस्कृती वाहक आहेत. बायका या संस्कृती पुढे नेण्याचा प्रयत्न करतात.

आपण पुरुषप्रधान संस्कृती असे म्हणतोय, पण मग आता फिल्टर लावण्याची वेळ आली आहे. तुम्ही टाकताय म्हणून आम्ही गप-गुमान ऐकणार नाही. त्यामुळे मी ती पोस्ट केली होती”, असे हेमांगीने यावेळी म्हटले.

हेमांगी सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या ‘कलर्स मराठी’वरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेतून हेमांगी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com