Pahije Jatiche Trailer: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण सांगणारा ‘पाहिजे जातीचे’ चा ट्रेलर प्रदर्शित...

Marathi Film Trailer: ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांनी ‘पाहिजे जातीचे’ हे अजरामर नाटक लिहिले. या नाटकावर आधारित ‘पाहिजे जातीचे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Pahije Jatiche Trailer Shared On Social Media
Pahije Jatiche Trailer Shared On Social MediaInstagram

Pahije Jatiche Trailer Shared On Social Media: ‘वाचायला शिका, विचार करायला शिका आणि महत्त्वाचं म्हणजे प्रश्न विचारायला शिका’ अशी शिकवण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. याच शिकवणीचा धागा पकडत ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांनी ‘पाहिजे जातीचे’ हे अजरामर नाटक लिहिले. या नाटकावर आधारित ‘पाहिजे जातीचे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शनिवारी (१५ जुलै) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

Pahije Jatiche Trailer Shared On Social Media
Aamir Khan Support China: अमिरला भारतात चीनी चित्रपटाचं प्रमोशन करणं पडलं महागात; प्रमोशनल व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

कबड्डी नरेंद्र बाबू दिग्दर्शित आणि डॉ. मल्लिकार्जुन एन. गजरे यांची निर्मिती असलेला ‘पाहिजे जातीचे’ हा चित्रपट सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर भाष्य करणारा आणि प्रश्न विचारणारा चित्रपट आहे, असे ट्रेलरवरून दिसून येते.

यात विक्रम गजरे, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, संजना काळे हे कलाकार मुख्य भूमिकेत असून पुन्हा एकदा सयाजी शिंदे आपला हटले अभिनय सादर करण्यासाठी तयार आहेत. एका लहान गावातील महिपती या महत्त्वाकांक्षी तरूणाची कथा असून, केवळ जातीमुळे समाज त्याचे पाय खेचू पाहतो, मात्र त्यातूनही तो यशस्वी भरारी कशी घेतो, यावर आधारलेला हा चित्रपट आहे.

Pahije Jatiche Trailer Shared On Social Media
Kajol Breaks In The Trial : आम्हाला संकोच वाटला नाही.. २९ वर्षांनी काजोलने मोडली नो-किसिंग पॉलिसी ; सहकलाकाराने शेअर केला शूटिंगचा अनुभव

ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमामध्ये कलाकार सयाजी शिंदे, विक्रम गजरे, संजना काळे, दिलीप अहिरे, निर्माते डॉ. मल्लिकार्जुन एन. गजरे, लेखक-दिग्दर्शक कबड्डी नरेंद्र बाबू, संवादलेखिका उमा कुलकर्णी, संगीत दिग्दर्शक अन्वेषा हे उपस्थित होते.

आजच्या काळातही जातीच्या एका लेबलमुळे होतकरू मुलांचे आयुष्य धुळीस मिळण्याचे मोठे प्रमाण दिसून येते. त्यामुळे जातीपातीत न अडकता केवळ हुशारी आणि गुणांच्या जोरावर प्रगती केली पाहिजे ही शिकवण देणारा हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात आपल्या भेटीस येत आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com