Parineeti Chopra – Raghav Chadha Engagement: ठरलं... परिणीती- राघव या ठिकाणी करणार साखरपुडा; तारीख पण फिक्स

परिणीती – राघव लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी आता अजूनच जोर धरला आहे. लवकरच ते साखरपुडा ही आटोपणार असल्याची चर्चा सध्या होत आहे.
Parineeti Chopra – Raghav Chadha Engagement
Parineeti Chopra – Raghav Chadha EngagementSaam Tv

Parineeti Chopra – Raghav Chadha Engagement Date: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमीचे खासदार राघव चड्ढा (Parineeti Chopra – Raghav Chadha) यांच्यातील नात्याची चर्चा सर्वत्र होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी परिणीती आणि आम आदमीचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत एका हॉटेल बाहेर स्पॉट करण्यात आलं. त्यानंतर दोघांच्याही नात्यांची चर्चा सोशल मीडियावर बरीच रंगली आहे. परिणीती – राघव लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी आता अजूनच जोर धरला आहे.

Parineeti Chopra – Raghav Chadha Engagement
Salama Khan's New Song: 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील सलमानचा नवीन अंदाज; 'येंतम्मा' गाण्याचा टीझर प्रदर्शित

परंतू, यावर अद्याप परिणीती – राघव यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कोणतीही अधिकृत माहिती माध्यमांना दिलेली नाही. परिणीती आणि खासदार राघव चढ्ढा यांना हॉटेलबाहेर माध्यमकर्मींनी स्पॉट केल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या. दरम्यान, आम आदमी पक्षाचे खासदार संजीव आरोरा यांनी ट्विट करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आणि आता दोघांच्या साखरपुड्याची चर्चा रंगत आहे.

एप्रिल महिन्यामध्ये परिणीती – राघव साखरपुडा करणार असल्याच्या चर्चांना सध्या सर्वत्र जोर धरला आहे. बहिणीच्या साखरपुड्यासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा दिल्लीत पोहोचली असल्याची चर्चा सुद्धा आता रंगत आहे. सोबतच परिणीतीचे आणखी काही नातेवाईक देखील दिल्लीत पोहाचल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दिल्लीत मोठ्या शाही थाटात परिणीती – राघव यांचा साखरपुडा होणार असल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे. सोशल मीडियावर सध्या परिणीती - राघव यांच्या साखरपुड्याचीच चर्चा होत आहे.

Parineeti Chopra – Raghav Chadha Engagement
Love Kills Season 2: सत्य घटनेवर आधारित एक प्रेमकथा ज्यामुळे एकाच कुटुंबातील ७ जणांचा झाला मृत्यू, लव्ह किल्स लवकरच भेटीला

मिळालेल्या माहितीनुसार, ‘लवकरच परिणीती आणि राघव दिल्लीत साखरपुडा करण्याची शक्यता आहे. अत्यंत छुप्या पद्धतीत दोघांचा साखरपुडा पार पडणार आहे. या सोहळ्यात दोघांचाही मित्र परिवार आणि कुटुंब सहभागी होणार आहेत.’ अद्याप तरी, चोप्रा आणि चड्ढा कुटुंबियांकडून परिणीती - राघव साखरपुडा करणार असल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. रविवारी दोघांना विमानतळावर एकत्र स्पॉट करण्यात आलं.

Parineeti Chopra – Raghav Chadha Engagement
Janhvi At Tirupati Temple: जान्हवीने बॉयफ्रेंडसह घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन, व्हिडिओ व्हायरल

गेल्या दिवसांपुर्वी परिणीती - राघव यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या त्यावेळी परिणीती मुंबईत राघव यांच्यासोबत दिसली होती. त्यानंतर त्यांच्या रिलेशनबद्दल प्रश्न विचारला असता त्यावेळी ती लाजून चुर झालेली दिसली. त्यामुळे चाहत्यांच्या मते, ते एकमेकांना डेट करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिणिती आपला साखरपुडा आटोपल्यानंतर पुन्हा शूटिंगच्या कामात व्यग्र होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com