'Pushpa 2'च्या चित्रिकरणाला अचानक ब्रेक; निर्मात्यांनी सिनेमाच्या प्रदर्शनाविषयी घेतलेल्या निर्णयाने खळबळ

Director Stop Shooting Of Pushpa 2: पुष्पा 2 चे शूटिंग अचानक थांबवण्यात आले आहे
Pushpa 2 Shooting
Pushpa 2 Shooting Instagram pushpamovie

Pushpa 2 Is On Hold: 'पुष्पा' चित्रपटाला मिळालेल्या भरगोस यशानंतर निर्माते आता 'पुष्पा २'च्या तयारीला लागले आहेत. पुष्पाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून अभिनेता अल्लू अर्जुन 'पुष्पा २' शूटिंगमध्ये व्यस्त होता. या चित्रपटाचा पहिला भाग 2021 मध्ये आला होता.

पुष्पा 2 च्या रिलीजची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुष्पा 2 चे शूटिंग अचानक थांबवण्यात आले आहे आणि याचे सर्वात मोठे कारण आहे चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार.

पुष्पा 2 च्या निर्माते त्यांनी आत्तापर्यंत चित्रपटाच्या जे काही भाग शूट केले आहेत. शूट झालेला भाग पाहून चित्रपटाचे निर्माते आनंदी नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Pushpa 2 Shooting
Hrithik Roshan-Saba Azad photos: हृतिक रोशनने गर्लफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करताच पत्नीने केली कमेंट

बॉलिवूडमधील अहवालानुसार, विजागमध्ये महिनाभराच्या शेड्यूलनंतर चित्रपटाचे शूटिंग स्थगित करण्यात आलेले ते शूट अद्याप सुरू झालेले नाही. तसेच त्यावर काही अपडेट देखील आलेली नाही.

अहवालात पुढे म्हटले आहे की, दिग्दर्शक सुकुमार हे शूटिंगचा रिझल्ट पाहून दिग्दर्शक समाधानी नाहीत. त्यामुळे अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाला म्हणजेच 8 एप्रिलला रिलीज होणारा पुष्पा 2 चा टीझरही पुढे ढकलण्यात आला आहे.

रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, आतापर्यंत जे काही शूट झाले आहे, ते निर्मात्यांना वापरायचे नाही. पुन्हा शूट सुरू करण्यापूर्वी त्यांना कंटेन्टवर पुन्हा काम करायचे आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर एक रिपोर्ट व्हायरल होत आहे की पुष्पा 2 हा चित्रपट यावर्षी नाही तर 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाचे शूटिंग ३ महिन्यांनी सुरू होणार असल्याचे देखील बोलले जात आहे. निर्मात्यांकडून चित्रपटाशी संबंधित अपडेटवर कोणतीही माहिती आलेली नाही.

अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेला पुष्पा 2 हा चित्रपट 450 कोटींच्या बजेटमध्ये बनवला जात आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन एक नाही तर दोन खलनायक म्हणजेच फहद फाजिल आणि विजय सेतुपतीशी लढताना दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com