
Pushpa The Rule: अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ प्रदर्शित होऊन जवळपास 2 वर्षे झाली आहेत आणि आता चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘पुष्पा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. दाक्षिणात्य चित्रपटसोबतच बॉलिवूडमधील चाहत्यांवरही त्या चित्रपटाने आपली जादू चालवली होती. आता असे म्हटले जात आहे की, ‘पुष्पा: द रुल’च्या पटकथेची कथा पुन्हा लिहिली जात आहे आणि बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सना या चित्रपटासाठी सामील केले जाण्याची शक्यता आहे.
चित्रपटात मुख्य भूमिकेत फहद फाजीलसोबत, रश्मिका मंदान्ना देखील दिग्दर्शक सुकुमारच्या तेलुगू ॲक्शन आणि ड्रामा असलेल्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातही पहिल्या चित्रपटाप्रमाणेच समंथा रुथ प्रभू एका खास गाण्याच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. आता दिग्दर्शक सुकुमार ‘पुष्पा: द रुल’ मध्ये बॉलिवूडच्या टॉप सुपरस्टारला कास्ट करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटात सलमान खान किंवा अजय देवगण चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांपूर्वी मनोज बाजपेयी यांना ‘पुष्पा: द रुल’ साठी अप्रोच करण्यात आल्याचे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले होते. मात्र, नंतर मनोजने त्या अफवांचे खंडन केले. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, ‘पुष्पा: द रुल’ चे शूटिंग या महिन्याच्या अखेरीस बेंगळुरूमध्ये सुरू होईल आणि फहद फाजील देखील अल्लू अर्जुनसोबत या शूटिंग शेड्यूलमध्ये सामील होणार आहे. या सगळ्याशिवाय या चित्रपटात सई पल्लवीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.
‘पुष्पा: द रुल’ची कथा अल्लू अर्जुन आणि फहाद फाजिल यांच्यातील संघर्षावर आधारित असेल, ज्यामध्ये फहद नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे, त्याची पुष्पासोबत ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाच्या शेवटी दोघांची ओळख झाली होती. आता आगामी भागात ‘ओ अंतवा’ आणि ‘श्रावल्ली’ सारखी उत्तम गाणी देखील असतील असे सांगितले जाते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.