Mrs Undercover: राधिकाचा कधीही न पाहिलेला अंदाज, टीझर पाहून “फॅमिली मॅन”च आठवला

Radhika Apte New Web Series: सध्या राधिका आपल्या ‘मिसेस अंडरकव्हर’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
Mrs Undercover Teaser
Mrs Undercover TeaserInstagram

Mrs Undercover Teaser: बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या राधिका आपटेची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होते. सध्या ती आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. लवकरच तिचा ‘मिसेस अंडरकव्हर’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Mrs Undercover Teaser
Hruta Durgule: स्वप्न सत्यात उतरले; सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेल्या हृताने मानले साऱ्यांचे आभार

नुकतंच राधिकाने तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यामातून केली आहे. राधिकाने आपल्या आगामी ‘मिसेस अंडरकव्हर’ चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर टीझर शेअर करत केली. सध्या तिच्या टीझरची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये, राधिका दिवसा एक गृहिणी आणि रात्री भूमीगत गुप्तहेराची भूमिका साकारते. ‘मोनिका ओ माय डार्लिंग’मध्ये दमदार अभिनय केल्यानंतर राधिका या चित्रपटात अंडरकव्हर एजंटची भूमिका साकारते.

चाहत्यांनी सोशल मीडियावर टीझर शेअर केल्यानंतर राधिकाच्या भूमिकेबद्दल सर्वांच्याच मनात कुतूहल निर्माण झाले. अद्याप टीझरमध्ये दाखवलेल्या भूमिकेप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. अनेक चाहत्यांनी राधिकाचा हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरेल अशी आशा बाळगली आहे. त्या टीझरवर चाहते कमेंट करुन म्हणतात, “राधिका तुझा लूक उत्तम असून या चित्रपटात तो अधिकच आकर्षक वाटतो.” तर आणखी एक म्हणतो, “मला वाटते की हा चित्रपट प्रचंड मजेदार असेल.” तर आणखी एका युजरने तिला “फिमेल फॅमिली मॅन” म्हणत तिच्या भूमिकेचे कौतुक केले.

Mrs Undercover Teaser
Ram Charan: फक्त ‘RRR’च नाही तर रामचरणचे हे हिट सिनेमे पाहिले आहेत का? जाणून घ्या

राजेश शर्मा आणि सुमित व्यास ‘मिसेस अंडरकव्हर’मध्ये दिसणार आहेत. ‘मिसेस अंडरकव्हर’ची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आली नसून, तो OTT प्लॅटफॉर्म वर अर्थात ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com