Rakhi Sawant: ‘स्टाईल नंतर मार आधी स्कार्फ सांभाळ...’ रमजान निमित्त रोझा सोडायला जाणाऱ्या राखीला नेटकऱ्यांनी खडेबोल सुनावले

रमजानचा महिना सुरु झाला आहे. राखी सावंतने लग्नानंतर धर्म बदलल्यानंतर पहिल्यांदाच मीडियासमोर बुरख्यात दिसली.
Rakhi Sawant Trolled
Rakhi Sawant TrolledSaam Tv

Rakhi Sawant Trolled: राखी सावंत सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. राखी आणि पती आदिल खान यांच्यातील वाद तर सर्वश्रृतच आहे. सध्या आदिल तुरुंगात असून अनेकदा राखीने पोलिस स्थानकाबाहेर त्याच्या साठी कधी रडली आहे, तर कधी त्याच्या विरोधात भांडली आहे. आता राखी पुन्हा एकदा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

नुकताच रमजानचा महिना सुरु झाला आहे. राखी सावंतने लग्नानंतर धर्म बदलल्यानंतर पहिल्यांदाच मीडियासमोर बुरख्यात दिसली. विरल भयानी या सोशल मीडिया पेजवर राखीचे व्हिडिओ शेयर करण्यात आले आहेत. या व्हिडिओत राखी बुरखा परिधान करून खास पोज देत आहे.

Rakhi Sawant Trolled
RRR Star: ज्युनिअयर एनटीआरच्या मुलांसाठी आलियाने पाठवले खास गिफ्ट, पोस्ट शेअर करत अभिनेत्याने केली 'ही' मागणी

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, या व्हिडीओत, राखीने बुरख्यात एन्ट्री करताच तिचा स्कार्फ हवेने उडाला. राखीने धावत जाऊन तो स्कार्फ पकडला आणि लगेच मीडियासमोर बोलायला आली. ‘मी रोजा सोडायला आली आहे.’ असं म्हणत ती पुढे निघाली. तर दुसऱ्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत, नुकतंच धर्मांतर केलेल्या राखी सावंतने तिच्या मित्रांसोबत इफ्तार पार्टी करून तिचा उपवास सोडताना दिसत आहे. सोबतच तिने यावेळी तिच्या चाहत्यांनाही रमजानच्या शुभेच्छा दिल्या.

राखी रमजानचा उपवास सोडताना, खाली जमिनीवर बसलेली दिसून आली. यावेळी तिचे मित्र- मैत्रीणी देखील होते. रोझा सोडण्याआधी तिने अल्लाची पूजा करत खजूर खाऊन उपवास सोडला.

यावरुन तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ‘तू कितीही नौटंकी केली तरी, तू कधीच समाधानी राहू शकत नाही.’ असं एक युजर तिला म्हणाला आहे, तर आणखी एक युजर म्हणतो, ‘नक्की तुझा धर्म कोणता आहे, हे फिक्स कर.’

तर आणखी एक युजर म्हणतो, ‘तुला धड बुरख्याचा आदर करता येत नाही, तुझे हे सर्व नाटकं सुरु आहेत. तुला आशिर्वाद मिळणार नाही.’ म्हणत तिला ट्रोल केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com