Tu Jhoothi Main Makkaar Trailer: श्रद्धा-रणबीरच्या रोमान्सची सर्वत्र चर्चा, 'तू झूठी मैं मक्कार' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या जोडीवर प्रेक्षकांचा प्रेमाचा वर्षाव.
Tu Jhoothi Main Makkaar Trailer
Tu Jhoothi Main Makkaar TrailerInstagram @shraddhakapoor

Tu Jhoothi Main Makkaar Trailer Out: सध्या रणबीर कपूर ट्विटरवर ट्रेंड होत आहे. याची दोन करणे आहेत. एक म्हणजे रणबीर-आलिया पुन्हा आई-बाबा होणार आहेत हे. तर दुसरे म्हणजे रणबीरच्या चित्रपटाचा ट्रेलर.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा 'तू झूठी मैं मक्कार' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलरमध्ये रणबीर आणि श्रद्धा कपूर यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणे या चित्रपटाच्या ट्रेकमध्ये देखील ट्विस्ट पाहायला मिळत आहे. 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा रोमान्स अनुभवायला मिळणार आहे.

दिग्दर्शक लव रंजन यांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच आपल्याला प्रेमाची नवी परिभाषा पाहायला मिळते. 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपट सुद्धा तसेच आहे असे म्हट्ले तर वावगे ठरणार नाही. ट्रेलर प्रदर्शित होताच त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. रणबीर कपूरचा या चित्रपटातील लूक 'बचना ए हसीनों' या चित्रपटातील लूकसारखा दिसत आहे.

Tu Jhoothi Main Makkaar Trailer
Badshah Police Case: रॅपर बादशहाला न्यायालयाचा अल्टिमेटम, हजर राहा नाहीतर...

या चित्रपटाच्या कथेतील ही जोडीला प्रेम करायचे पण एकत्र राहायचे नाही. ट्रेलरच्या सुरुवातीलाच रणबीर कपूर म्हणतो, आजकाल रिलेशनशिपमध्ये येणे सोपे आहे, पण त्यातून बाहेर पडणे कठीण आहे. नाते जोडणे सोपे आहे, तोंडाने कठीण. म्हणून खोटं बोलून त्याला पकडायचा नाहीये, तर खोटं बोलून त्यात खरं मिसळायचं आहे. ती मुलगी आहे बाकी सगळं करेलच. मला फक्त संशय घ्यायचा आहे. श्रद्धा देखील असाच विचार करताना दाखवली आहे. तिला सुद्धा रिलेशनशिपमध्ये येणे सोपे वाटते पण त्यातून बाहेर पडणे कठीण.

या दोघांमध्ये सुरु होता कोण जास्त वाईट आहे हे दाखविण्याचा खेळ. त्यामुळेच येतात चित्रपटात ट्विस्ट आणि टर्न. कोण जिंकत हे आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतरच कळणार आहेत. सध्या चित्रपटांना ट्रेलर खूप आवडत आहे. या सगळ्यात रंजक चित्रात असणारा आहे असे चित्रपटप्रेमी कमेंट करून सांगत आहेत.

स्टॅन्ड अप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सी देखील ट्रेलरमध्ये दिसत आहे. या चित्रपटातून अनुभव त्याच्या चित्रपटातील कारकिर्दीची सुरूवात करत आहे. 'तू झूठी मैं मक्कार' हा चित्रपट ८ मार्च, २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com