Shahid Kapoor Movie: 'इश्क विश्क'वाला शाहिद झाला ब्लडी डॅडी; चित्रपटाचा खतरनाक टीझर पाहून अंगाचा थरकाप उडेल

Shahid Kapoor 'Bloody Daddy' Teaser: ब्लडी डॅडी या चित्रपटामध्ये शाहिदचे खतरनाक भूमिका साकारत आहे.
Shahid Kapoor 'Bloody Daddy'
Shahid Kapoor 'Bloody Daddy'Instagram @shahidkapoor

Shahid Kapoor Upcoming Movie 'Bloody Daddy' Teaser Out: शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांचा चित्रपटाचे एक रोमँटिक पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली. शाहिद क्रितीचे पोस्टर पाहून आता कोणती लव्ह स्टोरी पाह्यला मिळते असे प्रेक्षकांना वाटू लागले होते. प्रेक्षकांना त्याच्या या प्रश्नांची उत्तर मिळाली नाहीत तोवर शाहिदच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर आणि लगेच टीझर प्रदर्शित झाला.

शाहिदच्या 'ब्लडी डॅडी' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. नावाप्रमाणे या चित्रपटामध्ये शाहिद गोळ्या झाडताना, मारामारी करताना दिसत आहे. ब्लडी डॅडी या चित्रपटामध्ये शाहिदचे खतरनाक भूमिका साकारत आहे.

Shahid Kapoor 'Bloody Daddy'
Gautami- Indurikar Maharaj Trolling: 'गौतमी पाटीलनं लावणीची संस्कृती बिघडवली, इंदुरीकर महाराजांनाही लोक नावं ठेवतात'

शाहिद कपूरचा हा अवतार पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल. याआधी शाहिदचा असा अवतार आपण पाहिलेला नाही. त्याच्या या टीझरला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे.

'ब्लडी डॅडी'च्या टीझरमध्ये शाहिद कपूर सुटाबुटात आरशासमोर उभा आहे. शाहिद एक सुशिक्षित आणि जेंटलमेन व्यक्ती दिसत आहे. त्यानंतर दुसऱ्या सीनमध्ये त्याच्या हातात चाकू आणि त्याचे भयावह रूप पाहायला मिळते. तो लोकांना कापून हवेत फेकणार 'किलिंग मशीन' सारखा वाटत आहे. 'ब्लडी डॅडी'मध्ये भरपूर अॅक्शन, रेझर शार्प अॅक्शन आणि भरपूर स्टंट आणि मसाला आहे, ज्याची झलक टीझरमध्ये पाहायला मिळाली आहे. (Latest Entertainment News)

तसेच टीझरमध्ये डॅडी अँगल देखील दिसत आहे. एका छोट्या मुलाला काही लोकांनी पकडून ठेवले . आता पकडून ठेवलेला मुलगा शाहिदच्या आहे का? आणि त्या मुलासाठी शाहिद हे सर्व करत आहे का? असे अनेक प्रश्न तुम्हाला टीझर पाहून पडतील. पोलीस, आरोपी आणि अॅक्शन आपल्याला या 'ब्लडी डॅडी' चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

शाहिद कपूर शिवाय संजय कपूरही 'ब्लडी डॅडी'मध्ये आहे. या चित्रपटात तो नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. तर डायान पेंटी देखील या चित्रपटामध्ये दिसणार. जिओ सिनेमा आणि जिओ स्टुडिओ संयुक्तपणे हा चित्रपट बनवत आहेत.

'ब्लडी डॅडी'चे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. यापूर्वी त्याने 'सुलतान', 'भारत' आणि 'टायगर जिंदा है' सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. हा चित्रपट 9 जून रोजी OTT वर प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com