Tipu Film Row: कर्नाटक निवडणुकीत 'टिपू' चित्रपटावरून गदारोळ! निर्मात्यांनी रिलीज केलं तोंडावर काळं फासलेलं पोस्टर

Tipu Film Row in Karnataka Election: टीपू सुल्तानच्या चेहऱ्यावर काळं फासलेलं रिलीज करण्यात आलं तसेच म्हैसूरच्या राजाचं वास्तव समोर आणण्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे.
Tipu Film Row
Tipu Film Rowsaam tv

Karnataka Assembly election, 2023: कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला (Karnataka Election) काही दिवस शिल्लक असताना 'टिपू; चित्रपटावरून गदारोळ सुरू झाला आहे. 'टिपू' (Tipu) चित्रपटाच्या निर्मात्यांनी रिलीज केलेल्या चित्रपटाच्या पोस्टरवरून हा वाद सुरु झाला आहे. टीपू सुल्तानच्या चेहऱ्यावर काळं फासलेलं रिलीज करण्यात आलं आहे. तसेच या चित्रपटातून म्हैसूरच्या राजाचं वास्तव समोर येईल असा पोस्ट निर्मात्यांकडून करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक बनवणारे निर्माते संदीप सिंग यांनी त्यांच्या 'टिपू' या नव्या चित्रपटाची घोषणा केली असून त्याच्या पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. यात टिपू सुलतानचा चेहऱ्याला काळं फासण्यात आलं आहे. म्हैसूरच्या राजाचं वास्तव समोर आणणार असल्याचा दावा संदीप सिंह (Sandeep Singh) यांनी केला आहे.

Tipu Film Row
Swapnil Mayekar Dies At The Age 46: चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच दिग्दर्शक हरपला, स्वप्नील मयेकर यांचे निधन

टिपूच्या कथेने माझ्या अंगावर शहारे आले - संदीप सिंह

चित्रपट निर्माते संदीप सिंह यांनी सांगितले की, टिपू सुलतानची वास्तविकता जाणून घेतल्यानंतर मला आश्चर्य वाटले. टिपूच्या कथेने माझ्या अंगावर शहारे आले. टिपू सुलतान किती क्रूर होता हे हे लोकांना माहीत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते असे मला वाटते. म्हणूनच मला हा चित्रपट 70mm वर प्रदर्शित करायचा आहे असे त्यांनी सांगितले. दरम्यान संदीप सिंह सध्या सावरकरांवर देखील 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपटही बनवत आहे. या चित्रपाटत अभिनेता रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत तर आहेच, शिवाय तो दिग्दर्शनही करत आहे.

इतिहासानुसार टिपू सुल्तान शूर वीर योद्धा...

निर्माते-दिग्दर्शक आणि अभिनेते संजय खान यांनी 1990 मध्ये दूरदर्शनसाठी 'द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान'ची निर्मिती केली होती. ही मालिका त्या काळात प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली. यात टिपू सुलतानच्या वीरतेची खूप चर्चा झाली होती. इतिहासाने आतापर्यंत टिपू सुलतानकडे स्वातंत्र्य सेनानी म्हणून पाहिले आहे. टीपून सुल्तानने ब्रिटीशांशी धैर्याने लढा दिला अशा इतिहासाने पाठ्यपुस्तके भरलेली आहेत. त्याच्या पराक्रमाने त्याच्या प्रदेशात प्रशासकीय बदल घडवून आणले आणि युद्धभूमीवर शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी शस्त्रास्त्रांमध्ये नवनवीन तंत्रे आणली अशे इतिहासात म्हटले आहे. परंतु निर्माते संदीप सिंह यांनी टिपू सुल्तानची वेगळी बाजू असल्याचा दावा केला आहे. (Latest Entertainment News)

Tipu Film Row
Adipurush: प्रतीक्षा संपली! रामाच्या रूपात येतोय प्रभास; 'या' तारखेला रिलीज होणार 'आदिपुरुष'चा ट्रेलर!

माझं ब्रेनवॉश करण्यात आलं होतं - संदीप सिह

परंतु आता या चित्रपटामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. चित्रपट निर्माते संदीप सिंह म्हणाले, "खरे सांगायचे तर टिपूला सुलतान म्हणण्याचीही लायकी नाही. आपल्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात दाखवल्याप्रमाणे तो एक धाडसी माणूस होता हे पटवण्यासाठी माझं ब्रेनवॉश करण्यात आलं होतं. पण त्याची क्रूर बाजू कोणालाच माहीत नाही. त्याची ही बाजू मला भावी पिढीसमोर उलगडून दाखवायची आहे".

कर्नाटक निवडणुकीत हनुमान चालिसा...

दुसरीकडे कर्नाटक निवडणुकीत हनुमान चालिसाचा वाद तीव्र झाला आहे. भाजप आज संध्याकाळी ७ वाजता संपूर्ण राज्यात हनुमान चालिसाचे पठण करणार आहे. कर्नाटकात बजरंग दल रस्त्यावर उतरलं आहे. प्रत्येक शहरात हनुमान चालिसाचे पठण करण्याची तयारी सुरू आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिल्याने खरे तर राजकारण अधिक तीव्र झाले आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com