Union Health Ministry New Rules For Anti Tobacco Warnings On Ott
Union Health Ministry New Rules For Anti Tobacco Warnings On OttSaam Tv

Anti-Tobacco Warning: OTT चं स्वातंत्र्य केंद्र सरकारने हिरावलं, तंबाखूविरोधी चेतावणी दाखवणे अनिवार्य...

Union Health Ministry New Rules For Anti Tobacco Warnings On Ott: केंद्रीय आरोग्य विभागाकडून ओटीटी माध्यमांना नवीन नियमावली जाहीर केली आहे.

Anti-Tobacco Warning On OTT:  जगभरात जागतिक तंबाखू विरोधी दिन ३१ मे रोजी साजरा केला जातो. या दिवशी केंद्रीय आरोग्य विभागाकडून नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ओटीटी माध्यमांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या नव्या नियमांनुसार, आता ओटीटी माध्यमांना देखील तंबाखू विरोधी चेतावणी देणे अनिवार्य असणार आहे. तसेच जर ओटीटी माध्यमांवरील कार्यक्रमांमध्ये नव्या नियमांचे पालन करण्यात आले नाही तर, केंद्रीय आरोग्य विभाग आणि माहिती व प्रसारण विभागाकडून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.

Union Health Ministry New Rules For Anti Tobacco Warnings On Ott
Vipul Shah On The Kerala Story Sequel: ‘कथा संपलेली नाही...’ म्हणत निर्मात्यांनी चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल दिली हिंट

त्यानुसार, चित्रपटात किंवा वेबसीरिजमध्ये तंबाखूविरोधी चेतावणी दाखवणे OTT प्लॅटफॉर्मवर बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या अधिसूचनेत म्हटले की, जर ओटीटी माध्यम नवीन नियमांचे पालन करण्यात अयशस्वी झाले तर केंद्रीय आरोग्य आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय त्यांच्यावर कठोर कारवाई करेल. जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या दिवशी आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता नेटफ्लिक्स, ॲमेझोन प्राइम व्हिडीओ, हॉटस्टार आणि सोनी लिव्हसारख्या ओटीटी ॲप्सवरील कार्यक्रमांना आता तंबाखू विरोधी चेतावणी देणे अनिवार्य असणार आहे.

नव्या नियमांनुसार, तंबाखूजन्य पदार्थ किंवा त्यांचा वापर करणाऱ्या कार्यक्रमांच्या सुरुवातीला आणि मध्ये कमीत कमी तीस सेकंदांसाठी तंबाखू विरोधातील चेतवाणी देणारी जाहिरात दाखवणे अनिवार्य असणार आहे. OTT प्लॅटफॉर्म तंबाखू उत्पादनांच्या प्रदर्शनाच्या कालावधी दरम्यान किंवा कार्यक्रमात त्यांचा वापर करण्याच्या कालावधीत स्क्रीनच्या खालच्या बाजूला तंबाखूविरोधात एक मुख्य संदेश देण्यासाठी देखील अनिवार्य करण्यात आले आहे.

Union Health Ministry New Rules For Anti Tobacco Warnings On Ott
Actor Harish Pengan Passes Away: टॉलिवूडवर शोककळा! 'या' प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, 49 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काय आहेत नियम?

  • नेटफ्लिक्स, ॲमेझोन प्राइम आणि हॉटस्टार यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या निर्मात्यांना, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि मध्यभागी कमीत कमी ३० सेकंदाची तंबाखूविरोधी आरोग्य चेतावणी दाखवणे अनिवार्य केले.

  • कार्यक्रमादरम्यान तंबाखू उत्पादनांचा वापर प्रदर्शित केल्यावर स्क्रीनच्या खालच्या भागात एक मुख्य स्थिर संदेश त्यांना तंबाखूविरोधी आरोग्य चेतावणी प्रदर्शित करणे देखील आवश्यक आहे.

  • सोबतच, किमान 20 सेकंदांचा ऑडिओ किंवा व्हिज्युअल डिस्क्लेमर देखील प्रदर्शित करणे आवश्यक आहे. हा डिस्क्लेमर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि मध्यभागी प्रदर्शित केला जाईल, अशी माहिती एएनआयच्या सूत्रांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com