उत्तरप्रदेशच्या निवडणुकीवर संघाचा फोकस ?

उत्तरप्रदेशच्या निवडणुकीवर संघाचा फोकस ?
mohan and modi

नवी  दिल्ली - कोरोना Corona काळात मोदी  सरकारची Central Government लोकप्रियता घटत आहे असे मीडिया रिपोर्ट आणि गेल्या ६ महिन्यांपासून सुरु असलेले शेतकरी आंदोलन या मोदी  सरकार साठी परीक्षेचा काळ म्हणावा लागेल. त्यातच २०२२ मध्ये ६ राज्यांच्या विधानसभा निवडणूका होणार आहेत. यात उत्तर प्रदेश , उत्तराखंड,गोवा,हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि पंजाब Punjab या राज्यांच्या निवडणूक होत आहेत. पण संघाला चिंता आहे ती उत्तरप्रदेशची. now focus on Uttar Pradesh elections

उत्तरप्रदेशातूनच Uttar Pradesh elections दिल्लीतील सत्तेचा मार्ग जातो म्हणूनच लोकसभेला ८० खासदार देणारे हे राज्य भापच्या हातात असावे हे संघपरिवाराला महत्वाचे वाटते. याच पार्श्वभूमीवर संघाचे बडे नेते दिल्लीत भाजप विषयी मंथन करत आहेत. सूत्रांच्यामाहिती नुसार उत्तर  प्रदेशातील सीएम योगी आदित्यनाथ आणि हरियाणाचे  सीएम मनोहर लाल खट्टर यांच्या विषयीची  राज्यातील जनतेमध्ये नाराजी हा विषय चर्चेत आहे.

मात्र योगी यांच्या खुर्चीला धोका नसला तरी युपीच्या मंत्रिमंडळात फेरबदल होऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल. तर यूपीतील पंचायत निवडणुकीतील पराभवामुळे प्रदेशाध्यक्ष बदलला जाईल. या पदासाठी  उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचे नाव चर्चेत आहे मात्र यामध्ये संघाची पसंती महत्वाची असेल.  now focus on Uttar Pradesh elections

ज्या ६ राज्यात निवडणुका होत आहेत त्यापैकी फक्त पंजाब मध्ये भाजपाची सत्ता नाही. शेतकरी आंदोलनामुळे अकाली दल भाजप पासून दूर गेले.  शेतकरी आंदोलनाचे मूळ पंजाब मध्ये आहे. त्यामुळे इथे भाजपाला पाय रोवण्यास अडचणी येत आहे. पंजाब मध्ये भाजपचा पाय मजबूत करण्यासाठी रणनिती गरजेची आहे. 

हे देखील पहा -

संघाची दिल्लीतील बैठक हि भाजपच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी महत्वाची आहे. बंगाल मध्ये अमित शाह यांची नीती पूर्णपणे यशस्वी नाही झाली. तिथे भाजपाला विरोधीपक्ष नेते पदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघाने सूत्र हाती घेतली आहेत. उत्तर प्रदेशमधील योगी यांचे मंत्री मंडळ आणि केंद्रातील मंत्रिमंडळातील बदलांवर संघाची छाप दिसली तर नवल वाटायला नको. थोडक्यात संघाच आजच मंथन म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून पाहावं लागेल.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com