बियाणं खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यास पोलिसांकडून बेदम मारहाण

Saam Banner Template (28).jpg
Saam Banner Template (28).jpg

बीड -  बी-बियाणे खरेदीसाठी गेवराई शहरात आलेल्या एका शेतकऱ्यास farmer, लाॅकडाऊनचे Lockdown नियम मोडल्याचं कारण सांगून, पोलिसांनी police काल बेदम मारहाण beaten केल्याची घटना घडलीय. मोतीराम चाळक रा.किंनगाव ता. गेवराई असं शेतकऱ्याचं नाव आहे. A farmer who came to buy seeds was beaten by the police

चाळक हे बी- बियाणे खरेदीसाठी काल सकाळी गेवराई शहरात आले असता, त्यांना पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर, बी-बियाणे खरेदीसाठी आलो असे सांगितल्या नंतरही पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केलीय. यामध्ये त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली आहे.

या सर्व प्रकरणानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यांनी, किनगाव येथे जाऊन जखमी शेतकरी चाळक यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.हा घडलेला प्रकार हा निंदनीय असून या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.कोरोनाच्या काळामध्ये पेरणीचे दिवस तोंडावर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी शहरांमध्ये बी बियाणे खरेदी करण्यासाठी येत आहेत. त्यांना पोलिसांकडून मारहाण होत आहे. A farmer who came to buy seeds was beaten by the police

हे देखील पहा -


ही घटना अतिशय निंदनीय आहे.मात्र दुसरीकडं कोरोनाचे नियम तोडून, वाळू हायवा, अवैध धंदे जोरात सुरू आहेत. याकडे मात्र पोलिस यंत्रणा दुर्लक्ष करत असून सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे.यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी अशा पोलिसांवर कारवाई करावी.अन्यथा शेतकऱ्यांच्या बांधावर बी बियाणे खते उपलब्ध करून द्यावेत. यानंतर एखाद्या शेतकऱ्याला मारहाण झाली तर, या सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com