बारामतीत राज्यातील पहिले मोफत म्युकर मायकोसिस शिबिर, आढळले १४ रुग्ण

मंगेश कचरे
गुरुवार, 20 मे 2021

कोरोना  आजाराच्या काळात अजून एका आजाराने डोकं वर काढला आहे ते म्हणजे म्युकर मायकोसिस. या आजाराची भीती जावी यासाठी राज्यातील पहिले  म्युकर मायकोसिस रोग निदान शिबीर बारामतीत पार पडले.

बारामती -  कोरोना corona आजाराच्या काळात अजून एका आजाराने डोकं वर काढला आहे ते म्हणजे म्युकर मायकोसिस mucormycosis. या आजाराची भीती जावी यासाठी राज्यातील पहिले  म्युकर मायकोसिस रोग निदान शिबीर  Camp बारामतीत Baramati पार पडले. The first free mucor mycosis camp at Baramati

बारामती येथील नटराज नाट्य कला मंडळ व इंडियन डेंटल असोसिएशन Indian Dental Association फलटण- बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत मोफत म्युकर मायकोसिस रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील  650  हून अधिक कोरोनातून मुक्त झालेल्या लोकांची  तपासणी करण्यात आली. या शिबिरात 14  म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळून आले.  या शिबिरात लक्षणे आढळून येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांवर बारामतीतच एका स्वतंत्र कक्षाची स्थापना करून मोफत उपचार करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव ठेवला जाणार असल्याचे नगरसेवक किरण गुजर Kiran Gujar यांनी सांगितले .

हे देखील पहा -

म्युकर मायकोसिस या आजाराची कोणतीही भीती न बाळगता योग्य वेळी उपचार घेतल्यास हा आजार बरा होतो. दात दुखणे, दातातून फेस येणे,तोंडाचा अर्धा भाग दुखणे, टाळूवरती तपकिरी किंवा काळसर डाग पडणे, डोळे लाल होणे, ताप येणे, नाकातून दुर्गंधी येणे आदी लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचार करून घ्यावेत. The first free mucor mycosis camp at Baramati

माजी महिला क्रिकेटरला विराट कोहलीची लाखमोलाची मदत

या शिबिरात सापडलेल्या म्युकर मायकोसिसच्या रुग्णांना लागणारा औषध पुरवठा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केला जाणार आहे. तसेच बारामतीत महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमधून या रुग्णांवर  उपचार केले जाणार आहे. आजार गंभीर असून त्याचे उपचारही महागडे आहेत. या पार्श्वभूमीवर लवकरच बारामतीत  शासकीय जागेत ३० बेडचे स्वतंत्र म्युकर मायकोसिसचे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये बारामती मधील शासकीय व खाजगी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जाणार आहेत.

Edited By - Shivani Tichkule
 


संबंधित बातम्या

Saam TV Live