आता 5 च्या आत घरात...लॉकडाऊन नाही तर 'हे' आहे कारण

Foot prints of tiger were found in the Bela of Bhandara district
Foot prints of tiger were found in the Bela of Bhandara district

भंडारा : भंडारा Bhandara जिल्ह्याच्या बेला Bela वासियो आता 5 च्या आत व्हा घरात. नाही नाही आम्ही तुमच्या गावात विशेष लॉकडाउन Lockdown बाबात बोलत नाही. तर तुमच्या गावाजवळ वनविभागाला  चक्क वाघाचे पंचमार्क Foot prints सापडले असून तुमच्या गावात वाघ फिरत आहे. त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. Foot prints of tiger were found in the Bela of Bhandara district

भंडारा जिल्ह्याच्या बेला गावात एकता मैदान ते बेला कोरंभी रोड वर रेल्वे  लाइन शिवारात वाघाच्या पायाचे  ठसे पसापडले आहेत. समाजसेवी पवन मस्के यांनी या संदर्भात भंडारा वन विभागाला यांची माहिती दिली असता, वनविभागाने क्षणाचा विलंब न करता घटनास्थळ गाठत पंचनामा सुरु केला. पाहणी दरम्यान वाघाचे ठसे सापडले आहेत. 

हे देखील पहा -

त्यामुळे ह्या बेला गावात वाघाचा वावर असल्याची स्पष्ट झाले आहे. बेला गावातील आणि गावाजवळ इतर पिंडकेपार, कोरम्बी, दवड़ीपार गावात कोरोना नंतर वाघाची दहशत निर्माण झाली आहे. Foot prints of tiger were found in the Bela of Bhandara district

गावकर्यांनी विशेष काळजी घेऊन 5 च्या आत घरात येऊन कोणीही बाहेर न निघण्याचे आणि, अत्यावश्यक रित्या घराबाहेर पडण्याची गरज असल्यास 4 ते 5 लोक काठया घेऊन निघण्याचे आवाहन वनविभागा सह समाजसेवी पवन मस्के यांनी केले आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com