माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची कोरोनावर मात

shivaji patil.
shivaji patil.

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाने Corona महाराष्ट्रासह Maharashtra देशभरात कहर दिसून येत आहे. अनेक नेत्यांना कोरोनाची लागण होऊन ते कोरोनामुक्त सुद्धा झाले आहेत. या पाठोपाठ त्यात माजी केंद्रीय गृहमंत्री Former Union Home Minister शिवराज पाटील चाकूरकर Shivraj Patil Chakurkar यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यांची नात रुद्राली पाटील यांनी तिच्या ट्विटर अकाउंट वरून याची माहिती दिली होती. मात्र आता त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केलेली आहे. Former Union Home Minister Shivraj Patil Chakurkar defeated Corona

माजी केंद्रीय गृहमंत्री चाकूरकर यांना उपचारासाठी नोएडा Noida येथील यथार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज त्यांनी कोरोनावर मात करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ते 85 वर्षांचे असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आता त्यांची तब्येत चांगली आहे अशी माहित देण्यात आली आहे.

हे देखील पहा -

कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान त्यांनी स्वतःला सुरक्षित ठेवले होते मात्र या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती. शिवराज पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे NCP महाराष्ट्र मधील जेष्ठ नेते आहेत. त्यांनी पक्ष तसेच देशपातळीवर अनेक पदे भूषवली आहेत.

इंदिरा गांधींपासून  Indira Gandhi ते सोनिया Sonia Gandhi आणि राहुल गांधी Rahul Gandhi यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि एकनिष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. देशाचे माजी गृहमंत्री आणि दहाव्या लोकसभेचे सभापती Speaker of the Lok Sabha चाकूरकर होते. तसेच चाकूरकर २०१० ते २०१५ दरम्यान राज्य पंजाब Punjab राज्याचे राज्यपाल होते. आणि चंदीगड Chandigarh केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक होते.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमधून विधानसभेवर १९७३ साली ते सर्वप्रथम निवडून आले होते. शिवराज पाटील यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये देखील अनेक मंत्री पदे भूषवलेली आहेत. 

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com