पिंपरी-चिंचवड मध्ये मोफत रिक्षा सेवा !

गोपाल मोटघरे
गुरुवार, 20 मे 2021

पिंपरी-चिंचवड मधील रिक्षाचालकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत कोरोना बाधित रुग्णांसाठी मोफत रिक्षा सेवा सुरू केली आहे.

पिंपरी - चिंचवड : मागील वर्षभरापासून अनेकवेळा लावल्या गेलेल्या निर्बंधाचा सर्वात मोठा फटका बसलाय तो खासगी वाहतुकदारीला, ज्यामुळे अनेक रिक्षा चालकांचा व्यवसाय डबघाईला आला आहे. Free Rickshaw Service In Pimpri-Chinchwad

असे असताना देखील पिंपरी-चिंचवड मधील रिक्षाचालकांनी आपली सामाजिक बांधिलकी Social Commitment जपत कोरोना Corona बाधित Patient रुग्णांसाठी मोफत Free रिक्षा Rickshaw सेवा Service सुरू केली आहे.

हे देखील पहा -

पिंपरी-चिंचवड Pimpri-Chichwad शहरातील बघतोय रिक्षा वाला ह्या फोरम चा हा उपक्रम अनेकांसाठी फायदयाचा ठरतोय, कारण वाहतुकीवर निर्बंध आणि अँबुलन्सच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेत वाहन मिळत नसल्याने त्यांचे हाल होत  आहेत. अशावेळी या रिक्षा उपलब्ध होत असल्याने अनेकांना मोठा धीर मिळतोय. Free Rickshaw Service In Pimpri-Chinchwad

विशेष म्हणजे काही रिक्षा चालकांनी तर आपल्या रिक्षांमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचीही व्यवस्था केली आहे. आपात्कालीन परिस्थितीत एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन कसं लावायचं आणि त्याला रुग्णालयात नेई पर्यंत कसा धीर द्यायचा याचं रीतसर प्रशिक्षण घेऊन हे रिक्षाचालक त्यांना सेवा पूरवत आहेत.

पहिला डोस कोव्हॅक्सिनचा तर दुसरा कोविशील्डचा दिल्याने तीन शिक्षक निलंबित

हे त्यांचं वैशिष्ट्य आहे, अर्थातच ही सेवा पुरवताना स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्वाच असल्याने प्रत्येक चालक पीपीई किट घालूनच ही सेवा पुरवत आहे. Free Rickshaw Service In Pimpri-Chinchwad

खरतर कोरोनाच्या या कठीण काळातही अनेक ठिकाणी भ्रष्टाचार होत असल्याचे आणि रुग्णांची लूट होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. मात्र बेरोजगारी आणि कोरोनाचे संकट डोक्यावर असतानाही या रिक्षाचालकांनी प्रामाणिकपणे जपलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live