रिक्षा चालकांच्या अनुदानासाठी खासदार बापट आक्रमक...

girish bapat
girish bapat

पुणे - कोरोना Corona काळात ताळेबंदी मुळे समाजातील विविध घटक अडचणीत आले आहेत. रिक्षा चालक ,विडी कामगार ,घरेलू कामगार व्यापारी इत्यादींना उदरनिर्वाह करणे मुश्किल झाले आहे. ह्या घटकांचा विचार करून पुण्याचे Pune खासदार गिरीश बापट Girish Bapat यांनी पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून त्यांच्या मानधनातून रिक्षा चालकांना Riksha Chalak मदत केली. या वेळी जवळपास १९ रिक्षा संघटनांचा समावेश आहे. Girish Bapat aggressive for rickshaw driver's subsidy 

'राज्य सरकार ने रिक्षा चालकांना सुमारे १८० कोटी अनुदान जाहीर केले परंतु अद्याप त्याचे वाटप झालेले नाही. पालक मंत्र्यांच्या बैठकीत वारंवार ह्या बाबत विचारणा केल्या नंतर पालकमंत्री यांनी वाहतूक आयुक्त यांना संपर्क केला तर करोना, ताळेबंदी मुळे आधीच सामान्य माणूस पिचला आहे. यात राज्य सरकारने नुसतेच रिक्षा चालकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आरटीओ कार्यालयात उद्या मुख आंदोलन करणार आहोत अशी माहिती यावेळी देण्यात आली.

हे देखील पहा -

या वेळी माजी नगरसेवक उज्वल केसकर ,नगरसेवक उमेश गायकवाड,  बापू मानकर, प्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापुरकर आदी उपस्थित होते. या वेळी खालील रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींना मदत देण्यात आली. Girish Bapat aggressive for rickshaw driver's subsidy 

१) पुणे शहर ऑटोरिक्षा फेडरेशन २) महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना ३) विद्यार्थी वाहतूक संघटना ४) सावकाश रिक्षा संघ ५) मनाली ऑटो रिक्षा संघटना ६) महाराष्ट्र रिक्षा पंचायत ७) राष्ट्रवादी रिक्षा संघटना ८) पुणे शहर जिल्हा वाहतूक सेवा संघटना ९) क्रांतिवीर रिक्षा संघटना १०) सत्यसेवा वाहतूक संघ पुणे, ११) आम आदमी रिक्षा चालक संघटना १२) एआयएमआयएम पुणे रिक्षा संघटना १३) भाजपा वाहतूक आघाडी १४) पीएस अमर ऑटो रिक्षा संघटना १५) फडके हौद रिक्षा संघटना १६) रिक्षा परिषद १७) भारतीय दलित कोब्रा रिक्षा संघटना १८) रिक्षा ब्रिगेड १९) महाराष्ट्र रिक्षा सेना.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com