अवैध रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला गोंदिया रेल्वे पोलिसांनी केली अटक

Gondia Railway Police have arrested a passenger carrying lakhs of rupees in cash
Gondia Railway Police have arrested a passenger carrying lakhs of rupees in cash

गोंदिया:  अबब ! एका साध्या पिशवित लाखो रूपयाची रक्कम रेल्वेने घेऊन जाणाऱ्या एका आरोपी ला गोंदिया रेल्वे पोलिसांनी Gondia Railway police अटक केली आहे. त्यांच्याकडून 14 लाख 74 हजार 300 रुपयांची अवैध रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. संजू मंगल बेहरा (वय 35) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी चे नाव आहे. Gondia Railway Police have arrested a passenger carrying lakhs of rupees in cash

गोंदिया रेल्वे स्थानकावर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गोंदिया रेल्वे पोलिसांद्वारे सातत्याने तपास अभियान चालविण्यात येत असून त्या अंतर्गत तपासणी व गस्त दरम्यान रायपूरवरून येणार्‍या जनशताब्धी एक्सप्रेसमध्ये काही संशयास्पद वस्तू वाहून नेले जात असल्याची गुप्त माहिती  मिळाली.

हे देखील पहा -

लागलीच  स्टाफसह प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभ्या जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये पेट्रोलिंग सुरू केली असता, त्यांना एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळला. त्याची चौकशी केल्यावर त्याने आपले नाव संजू मंगल बेहरा (वय 35) रा. तरुणनगर, काली मंदिर माता वॉर्ड, पंडरीतलाई, जिल्हा रायपूर असे सांगितले व सदर गाडीने रायपूर जाण्याची माहिती दिली. त्याच्या खांद्यावर असलेल्या बॅगबाबत विचारणा केल्यावर त्याने असमर्थता दाखवत कोणत्याही प्रकारे समाधानकारक उत्तर दिले नाही. Gondia Railway Police have arrested a passenger carrying lakhs of rupees in cash

त्यामुळे त्याच्या बॅगची तपासणी करण्यात असता त्यात 2000, 500, 200 व 100 रुपयांच्या नोटा अशा 14 लाख 74 हजार 300 रुपये असल्याचे आढळले. या रकमेच्या मालकी हक्काबाबत त्याने कोणतेही दस्तावेज किंवा पुरावे सादर केले नसल्याने त्याला अटक करण्यात आली असून, रेल्वे कायदा नुसार कारवाई करण्यात येत आहे. 

सदर प्रकरणाची माहिती गोंदिया रेल्वे पोलिसांनी आयकर विभाग गोंदियाला दिली आहे. ही रक्कम अवैध व्यवसायाशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com