25 वर्षीय हरवलेल्या महिलेचा गोंदिया रेल्वे पोलिसांनी घेतला 2 दिवसांत शोध

अभिजीत घोरमारे
मंगळवार, 1 जून 2021

गोंदिया रेल्वे स्थानक gondiya Railwe station हरवलेल्या एक 25 वर्षीय विवाहित  महिला हरवल्याची घटना समोर आली आहे. गोंदिया पोलिसानी या हरवलेल्या महिलेला शोधून तीच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले आहे.

गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानक gondiya Railwe station हरवलेल्या एक 25 वर्षीय विवाहित  महिला हरवल्याची घटना समोर आली आहे. गोंदिया पोलिसानी या हरवलेल्या महिलेला शोधून तीच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले आहे. संबंधित महिलेचे नाव सविता गेडाम असे आहे.  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सविता गोंदियातील कोरबा रेल्वेस्थानकातून Korba Railwe station मध्यप्रदेशतील madhypradesh बालाघाटला Balaghat जायला निघाली होती. यावेळी तिच्यासोबत तिचा पती प्रकाश गेडाम  आणि तिची लहान मुलगी आकांक्षाही होती.  

सविता आपल्या पती आणि मुलीसोबत कोरबा रेल्वे स्थानकात पोहचल्यानंतर मुलीला नाश्ता आणणण्यासाठी बाहेर गेली होती. सोबत पतीचा मोबाइलदेखील घेऊन गेली होती.  कोरबा रेल्वे स्थानकातील प्लॉटफार्म-1 च्या मुख्य प्रवेशद्वारातून ती  बाहेर पडली. मात्र बराच वेळ झाला तरी ती परत आली नाही.  त्यामुळे  प्रकाश आणि आकांक्षा दोघेही चिंतेत पडले होते. त्यांनी तातडीने रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली.  पोलिसांनी देखील  परिस्थितीची दखल घेऊन  तातडीने सविताचा शोध सुरू केला.   

हे देखील पहा - 

दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी सविताला मध्यप्रदेशतील बालाघाटमधील आपल्या नातेवाईकांच्या घरतून ताब्यात घेतले आणि तीच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले.  गोंदिया रेल्वे पोलिसांनी दोन दिवसात सविताला शोधून तीच्या पतीच्या ताब्यात दिले त्यावेळी  पती आणि पोलिसांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहण्यासारखे होते.  तथापि, आता गोंदिया रेल्वे पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व जिल्ह्यात कौतुक केले जात आहे. 

मूर्तिजापुरात लसीकरण केंद्रावर राडा; लसीकरण अधिकाऱ्याला मारहाण

Edited By - Puja Bonkile 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live