मूर्तिजापुरात लसीकरण केंद्रावर राडा; लसीकरण अधिकाऱ्याला मारहाण

akola centre.jpg
akola centre.jpg

अकोला : अकोल्यातील Akola  मुर्तिजापूर Murtijapur  येथील लसीकरण केंद्रावर Vaccination Centre  राडा करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यातील तिसरा फरार झाला.  या तिघांनी लसीकरण केंद्रावर गोंधळ घातल्यामुळे काही काळासाठी लसीकरण बंद पडले होते. मात्र पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर लसीकरण प्रक्रिया पुन्हा सुरळीत झाली. (Vaccination officer beaten at Murtijapur center) 

अकोला पोलिसानी याबाबत  माहिती दिली आहे. मुर्तिजापूर येथील नगर पालिका परीसरातील लसीकरण केंद्रावर आज लसीकरणाला सुरुवात झाली. दरम्यान कोविशिल्डच्या दुसरा डोज देण्याची प्रक्रिया यंत्रणेने सुरु केली. कोव्हॕक्सिन चा दुसरा डोज देण्याची प्रक्रिया सुरू करताच प्रेम दुबे व सागर दुबे यांनी नोंदणी करणारे हेमंत तायडे यांच्याशी वाद घातला. नोंदणी करतांना संबंधितास रांगेतील मागच्या व पुढच्या व्यक्तीविषयी का विचारता? असा सवाल उपस्थित करून अर्वाच्च शिविगाळ केली. उपस्थित नागरिकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न झिडकारून लावत शिवीगाळ सुरूच ठेवली. काही वेळाने लसीकरण केंद्रात दाखल झालेल्या दिनेश दुबे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यास मारहाण केली. या सर्व घटनेचा  व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी यातील दोघांना ताब्यात घेतले तर तिसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. 

हा प्रकार उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांना कळताच त्यांनी पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. लगेच शहर पोलीसांनी प्रेम दुबे, सागर दुबे, दिनेश दुबे या तिघांविरुद्ध भादंविच्या ३५३, ३३२, २९४, ५०४, ५०६ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. प्रेम व सागर दुबे यांना अटक करण्यात आली, दिनेश दुबे फारार झाला. ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनात उप निरीक्षक आशीष शिंदे पुढील तपास करीत आहेत.

Edited By - Anuradha Dhawade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com