सरकार तुमच्या व्हॉट्अॅप मॅसेजवर नजर ठेवतंय का ?

साम टीव्ही ब्यूरो
शुक्रवार, 28 मे 2021

हा फेक मॅसेज असल्यामुळे यामध्ये कोणतेही सत्य नाही.

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे नव्या Digital डिजिटल नियमाबद्दलचा वाद घेऊन व्हॉट्अॅप WhatsApp सरकारच्या विरोधात कोर्टात गेला आहे. व्हॉट्अॅपने WhatsApp नव्या डिजिटल नियमांबद्दल म्हंटले आहे की, असे करणे मॅसेजला Message Trace ट्रेस करण्याप्रमाणे आहे. त्यामुळे वापरकर्त्यांची Users गोपनीय माहिती Confidential information उघडकीस येवू शकते. तेव्हा सरकारने त्वरित उत्तर दिले आहे. Is the government monitoring WhatsApp messages?

अंबरनाथचं जीआरपी धरण म्हणजे मद्यपींचा अड्डा

या परिस्थितीत एक मॅसेज व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या मॅसेजमध्ये असा दावा केला आहे की, सरकार आता तुमच्या मॅसेजवर लक्ष ठेवणार आहे. या अॅपवर एक फीचर आहे. त्यामुळे एका व्यक्तीने पाठवलेला मॅसेज दुसऱ्या व्यक्तीने वाचला असेल तर दोन निळ्या (blue) टिक्स दिसतात. तसेच असे देखिल सांगितले आहे की, सरकारने जर तुमचा संदेश वाचला असेल तर तिसरी टिक् देखिल येणार आहे. 

या व्हायरल मॅसेजमध्ये असे म्हंटले जात आहे की,  व्हॉट्अॅपवरील मॅसेजवर  सरकारने कारवाई केल्यास मॅसेजसमोर दोन रेड टिक्स दिसतील.  तसेच असा दावा केला जाता आहे की, तुमच्या मॅसेजसमोर तीन लाल टिक्स दिसल्या म्हणजे ती गोष्ट न्यायालयात गेली आहे. चुकीची माहिती किंवा मॅसेज पाठविल्यास तुम्हाला न्यायालयाकडून नोटिस येऊ शकते. 

हा फेक मॅसेज असल्यामुळे यामध्ये कोणतेही सत्य नाही. व्हॉट्अॅप  मॅसेजवर सरकारकडून कोठल्याही प्रकारचा लाल किंवा ब्ल्यु टिक येणार नाही. तुमचा व्हॉट्अॅप  मॅसेज कोणतेही थर्ड पार्टी वाचू शकणार नही. याचा अर्थ सरकार तुमच्या व्हॉट्अॅप  मॅसेजवर लक्ष ठेवणार नाही. व्हॉट्अॅपवरील सर्व मॅसेज एंड- टु-एंड एन्स्कप्टेड असतात. गेल्या वर्षी देखिल असाच मॅसेज  व्हायरल झाला होता. यामुळे सामान्य माणसांच्या मनात भीती निर्माण झाली होती. 

आशा प्रकारचे मॅसेज व्हॉट्अॅप मिळाल्यास लगेच रिपोर्ट करावे. ज्यांनी तुम्हाला अशा प्रकारचे मॅसेज पाठविले असेल ,त्याचे चॅट उघडा आणि नंतर प्रोफाइल इन्फॉर्मेशनमध्ये जा. तिथे स्क्रोल केल्यावर, तुम्हाला रीपोर्ट कॉनटॅक्ट असा पर्याय दिसेल. तिथे टॅप करून रिपोर्ट करा.    

Edited By - Puja Bonkile 

 

हे देखिल पहा - 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live