बापरे ! बुवाने केली आजीला बेदम मारहाण.. वाचा सविस्तर

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 7 जून 2021

एक व्हिडीओ कल्याण द्वारली गावच्या हद्दीतला सोशल मीडियावर तुफान पसरत आहे. या व्हिडीओमध्ये पाण्याचा वादातून एका ८५ वृद्धाने आपल्या ८० वर्षाच्या वृद्ध पत्नीला बेदम मारहाण करत असल्याचं चित्र दिसत आहे.

कल्याण : एक व्हिडीओ Video कल्याण द्वारली गावच्या हद्दीतला सोशल मीडियावर तुफान पसरत आहे. या व्हिडीओमध्ये पाण्याचा वादातून एका ८५ वृद्धाने आपल्या ८० वर्षाच्या वृद्ध पत्नीला बेदम मारहाण करत असल्याचं चित्र दिसत आहे. Grandpa beat grandmother for water 

कल्याण Kalyan मलंगगड जवळील द्वारली गावच्या हद्दीमध्ये एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओ मधल्या मारहाण करणाऱ्या इसमाचे नाव गजानन चिकणकर असे आहे. या दृश्यामुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

यवतमाळ येथे जिम उघडल्याने फिटनेस प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण.. 

हिल लाईन पोलिसांनी संबंधित कुटुंबाला समज दिली असून, या संपूर्ण घटनेचा तपास चालू आहे. परंतु यासंदर्भात पोलिसांनी Police स्पष्ट्पणे बोलण्यास यावेळी नकार दिला आहे.

व्हिडीओ मध्ये वृद्ध पती मारहाण करत असताना, वृद्ध महिला त्याला हात पसरून मारू नका अशी विनंती करताना दिसत आहे. मात्र बुवा तिचे काही ऐकत नाही.

31 मे रोजी ही घटना घडली आहे, त्यांच्या नातवाने हा व्हिडिओ बनवला होता. पोलिसांनी माहिती दिली कि, गजानन बुवा चिकणकर सध्या आळंदीला गेले आहेत. पोलिसांनी  व्हिडीओ व्हायरल होताच घटनास्थळी धाव घेतली. 

Edited By-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live