लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त भावपूर्ण आदरांजली

A heartfelt tribute to the birth anniversary of Vilasrao Deshmukh
A heartfelt tribute to the birth anniversary of Vilasrao Deshmukh

लातूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रियमंत्री विलासराव देशमुख Vilasrao Deshmukh यांची भारतीय राजकारणातील लोकशाही व्यवस्थेतील ग्रामपंचायत ते संसद अशी राजकीय वाटचाल झाली आहे. राजकारण हे विकासाचे माध्यम मानून त्यांनी लोकासेवेचे अविरत कार्य केले. त्यांची ७६ वी जयंती अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आली. कोविड १९ प्रादुर्भाव नियमावलीचे पालन करीत देशमुख कुटुंबीयांनी बाभळगाव येथील विलासबागेतील स्मृतिस्थळी जाऊन विनम्र अभिवादन केले, आंदराजली अर्पन केली. A heartfelt tribute to the birth anniversary of Vilasrao Deshmukh

लातूरसह Latur राज्यभरात कोविड १९ चे संकट कोसळले आहे. या कोविड १९ विषाणुचा प्रादूर्भाव वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या राज्य आणि देशभरात लॉकडाऊन Lockdown लागू करण्यात आला आहे. या साथीमुळे सर्वजणच अडचणीत आहेत. कोवीड १९ प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. याकरीता एकत्रित लोक जमा होण्यावर निर्बध घालण्यात आले आहेत.

हे देखील पहा -

या पार्श्वभुमीवर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७६ वी जयंतीदिनी बाभळगाव येथे सामुदायीक आंदराजली कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय देशमुख कुटंबियांनी घेऊन, सर्वांनी आहे त्या ठिकाणी राहूनच आपल्या नेत्यांना आंदराजली अर्पण करावी असे आवाहन केले होते.

त्यामुळे बुधवार रोजी सकाळी प्रारंभी स्मृतिस्थळी फक्त देशमुख कुटूंबियानीच परस्परामध्ये सुरंक्षित अंतर ठेऊन अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने बाभळगाव Babhulgaon येथील स्मृतीस्थळावर विनम्र अभिवादन करून आंदराजली अर्पण केली. A heartfelt tribute to the birth anniversary of Vilasrao Deshmukh

यात श्रीमती वैशाली विलासराव देशमुख Vaishali Deshmukh, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, सुवर्णाताई दिलीपराव देशमुख, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख Amit Deshmukh, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख Dhiraj Deshmukh यांनी आंदराजली वाहीली. यानंतर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी आंदराजली वाहीली.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com