१०५ वर्षांच्या आजोबांची कोरोनाला धोबीपछाड

दीपक क्षीरसागर
शनिवार, 24 एप्रिल 2021

लोदगा गावातील रहिवाशी असलेले हे आहेत १०५ वर्ष वय असलेले धोंडीराम अंधारे. आयुष्यभर शेतीत कष्ट करून शरीराबरोबरच मनानेही कणखर असलेल्या धोंडीराम अंधारे या १०५ वर्षाच्या आजोबाला गेल्या आठवड्यात कोरोनाने गाठले.  त्यांना खोकला, ताप आणि दम लागण्याची लक्षणे दिसून येत असल्याने घरच्यांनी त्यांची कोरोना चाचणी केली

लातूर : कोरोनाच्या Corona भीतीमुळं आणि धास्तीने अनेकांचा जिव टांगणीला लागलेला असतानाच लातूर Latur जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील लोदगा गावातल्या १०५ वर्षाच्या जिगरबाज आजोबांनी कोरोनाला धोबीपछाड देत कोरोनावर मात केली असून  केवळ सात दिवसातच त्यांनी कोरोनाला हरवलंय. Hundred Year old defeated corona in Latur

लोदगा गावातील रहिवाशी असलेले हे आहेत १०५ वर्ष वय असलेले धोंडीराम अंधारे. आयुष्यभर शेतीत कष्ट करून शरीराबरोबरच मनानेही कणखर असलेल्या धोंडीराम अंधारे या १०५ वर्षाच्या आजोबाला गेल्या आठवड्यात कोरोनाने गाठले.  त्यांना खोकला, ताप आणि दम लागण्याची लक्षणे दिसून येत असल्याने घरच्यांनी त्यांची कोरोना चाचणी केली. यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या वयात कोरोनाने संक्रमित झाल्याने घरचे सर्वच सदस्य चिंतेत बुडाले. त्यांना लातूर येथील खाजगी रुग्णालयात Hospital उपचारासाठी भरती करण्यात आले. 

९० वर्षांच्या आजोबांची सलग दोनदा कोरोनावर मात

सगळीकडे भीतीचे Threat वातावरण असतानाही या आजोबांनी धीर सोडला नाही. नियमित उपचाराला ते उत्तम प्रतिसाद देत असल्याने आणि मनाने थोडंही खचले नसल्याने औषधांचा चांगला परिणाम त्यांच्या प्रकृतीवर दिसू लागला. उपचार करीत असलेल्या डॉक्टरांशी आणि सेवा देत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी आजोबा सकारात्मक Positivity बोलत होते. 'मला काहीही होणार नाही' असा त्यांचा ठाम विश्वास होता. या सकारात्मक विचाराने आजोबानी कोरोनाच्या विषाणूला आपल्या शरीराबाहेर जाण्यास भाग पाडले.  Hundred Year old defeated corona in Latur

सात दिवसानंतर त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली त्यात कोरोनाचा अंश देखील शिल्लक नव्हता. एकीकडे संपूर्ण आठ सदस्यांचे कुटुंब कोरोनाग्रस्त होऊन कोरोनाशी लढा देत असताना आजोबांची ही जिगरबाज ईनिंग कुटुंबातल्या सदस्यांना प्रेरणा देणारी ठरली. पंचवीस वर्षाच्या तरुणालाही लाजवेल अशी सकारात्मक दृष्टी आणि मनोबल यामुळे आजोबांनी कोरोनाला हरविले. त्यामुळं गावातल्या ग्रामस्थांना देखील त्यांचा अभिमान व कौतुक वाटते आहे. राज्यात आणि देशात एकीकडं कोरोनानं हाहाकार माजवला आहे. त्यामुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण असतानाच या आजोबांमुळे नक्कीच सकारात्मक ऊर्जा सर्वांनाच मिळाली आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live