मोबाईल घेताय तर ही बातमी  वाचाच 

साम टीव्ही न्यूज
रविवार, 15 मार्च 2020

 चीनवरुन होणारा पुरवठा प्रभावित झाल्यामुळे बहुतांश ब्रँडचे मोबाइल फोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट आधीच महाग झाले होते.  जीएसटीचे दर १२ टक्क्यांवरुन वाढवून १८ टक्के केल्यामुळे मोबाइल फोन महागणार आहेत. कोरोना विषाणूच्या आधीच याच्या किमती वाढल्या आहेत

शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी समितीची ३९ वी बैठक झाली कोरोनामुळे देश हादरुन गेला असतानाच देशातील नागरिकांना आज महागाईचा डबल डोस मिळाला आहे. सकाळी पेट्रोल-डिझेल तीन रुपयांनी महागल्यानंतर सायंकाळी जीएसटी समितीच्या बैठकीनंतर मोबाइलवरील जीएसटीचा दर १२ टक्क्यांवरुन १८ टक्के केल्याची घोषणा करण्यात आली. .

 चीनवरुन होणारा पुरवठा प्रभावित झाल्यामुळे बहुतांश ब्रँडचे मोबाइल फोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट आधीच महाग झाले होते.  जीएसटीचे दर १२ टक्क्यांवरुन वाढवून १८ टक्के केल्यामुळे मोबाइल फोन महागणार आहेत. कोरोना विषाणूच्या आधीच याच्या किमती वाढल्या आहेत.जीएसटी समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार आता काड्याच्या पेटीवर १२ टक्के कर लागेल. पूर्वी हाताने तयार केलेल्या काडी पेटीवर ५ टक्के आणि इतरांवर १८ टक्के कर लागत असत. 

हेही वाचा ::   कोरोना विषाणूचा संशयित रुग्णाचा बुलडाण्यात मृत्यू

भारतात या सेवेचा अभाव आहे. कारण विमान कंपन्यांना मोठा खर्च हा विमानांच्या देखभालीवर करावा लागतो. कारण त्यांना आपली विमाने विदेशात पाठवावी लागतात.  त्याचबरोबर एअरक्रॉफ्टच्या देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (एमआरओ) सेवेवर जीएसटीचे दर १८ टक्क्यांवरुन कमी करुन ५ टक्के करण्यात आले आहे. याचा अर्थ भारतात एमआरओ सेवा वाढवण्यावर भर देणे आहे. 

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, व्यापाऱ्यांना दिलासा देताना आर्थिक वर्ष २०१९-१९ साठी जीएसटी रिटर्न दाखल करण्याची तारीख वाढवून ३० जून २०२० केली आहे. ज्यांची उलाढाल २ कोटींपेक्षा कमी आहे त्यांना उशिरा रिटर्न दाखल करण्यावर दंड आकारला जाणार नाही. 

webTittle ::  If you are mobile, read this news

 


संबंधित बातम्या

Saam TV Live