हिंगोलीत शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह अशोक चव्हाण यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन 

संदीप नागरे
शनिवार, 15 मे 2021

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय दिल्या नंतर भाजप महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.  महा विकास आघाडी सरकार न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात कमी पडल्यानेच आरक्षण रद्द झाल्याचा आरोपी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र या आरक्षणाच्या विषयावरून आता महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलनाच्या ठिणग्या पडत आहेत

हिंगोली : सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court मराठा आरक्षणावर Maratha reservation निर्णय दिल्या नंतर भाजप BJP, महाविकास आघाडी सरकारच्या Mahavikas Aghadi government मंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.  महा विकास आघाडी सरकार न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात कमी पडल्यानेच आरक्षण रद्द झाल्याचा आरोपी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांनी केला. मात्र या आरक्षणाच्या विषयावरून आता महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलनाच्या ठिणग्या पडत आहेत Jode Maro Andolan to Sharad Pawar Uddhav Thackeray and Ashok Chavans symbolic image

तर, या पुढे मराठा समाजाला आरक्षण देणे हे केंद्र सरकारच्या हातात असून, केंद्र सरकारने या साठी पावले उचलावीत अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे Uddhav Thackeray यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले. 

हे देखील पहा -

हिंगोली मध्ये आठ दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी बांधावर जात मराठा आरक्षण मिळावे या साठी आंदोलन केले, तर आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आक्रमक संघटना म्हणून ओळख असलेल्या मराठा शिवसैनिक संघटनेने Shivsainik Sanghtana हिंगोली शहरातील गांधी चौक येथे आचानक कार्यकर्त्यांसह जमा झाले.

महाविकास आघाडी सरकार चालविणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण Ashok Chavan यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत सरकारचा निषेध केला.

राजीव सातव यांच्या शरीरात नवा व्हायरस 

दरम्यान अचानक झालेल्या  या आंदोलनामुळे काही काळ पोलिसांची Police धावपळ उडाली होती, पोलिसांनी आंदोलन करणारे मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष  विनायक भिसे पप्पू चव्हाण Vinayak Bhise Pappu Chavan यांच्या सह कार्यकर्त्यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कार्यवाही केली. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live