ज्योतिबा नाव ठेवणार होते, ज्योतिरादित्य कुठून सुचलं?
ज्योतिबा नाव ठेवणार होते, ज्योतिरादित्य कुठून सुचलं?
सिद्धेश सावंत
मंगळवार, 10 मार्च 2020
ज्योतिरादित्य हे नाव तसं नेहमी वापरल्या जाणा-या नावांपैकी नक्कीच नाही. ज्योतिरादित्य हे नाव ठेवण्यामागची गोष्टदेखील फारच इंटरेस्टिंग आहे.
मध्य प्रदेश - ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नावाची सध्या तुफान चर्चा आहे. काँग्रेसला ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जोर का झटका दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. ज्योतिरादित्य यांची काँग्रेसवर असलेली नाराजी गेल्या काही काळात उघड झाली होती. अखेर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानं या नाराजीवर शिक्कामोर्तब झालं आहे. साहजिकच आहे, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबद्दल आता नवनाव्या गोष्टी समोर येत आहेत.
ज्योतिरादित्य हे नाव तसं नेहमी वापरल्या जाणा-या नावांपैकी नक्कीच नाही. ज्योतिरादित्य हे नाव ठेवण्यामागची गोष्टदेखील फारच इंटरेस्टिंग आहे. सिंधिया हे आडनाव महाराष्ट्रातल्या शिंदे आडनावाशी मिळतं जुळतं आहे. नव्हे ते महाराष्ट्राशीच जोडलं गेलेलं नाही. ज्योतिरादित्य शिंदे असा उल्लेख अनेकदा केला जातो. ज्योतिरादित्य सिंधिया यांचं मुळचं घराणं हे महाराष्ट्रातीलच आहे. मध्य प्रदेशात जाऊन स्थायिक झालेल्या या शिंदे आडनावाचा उल्लेख पुढे जाऊन सिंधिया असा केला जाऊ लागला. ज्योतिरादित्य सिंधिया हे नाव कुठून आलं, याचाही खिस्सा खास आहे.
कसं ठेवलं ज्योतिरादित्य सिंधिया हे नाव?
ज्योतिरादित्य सिंधिया यांचं नाव खरंतर वेगळंच ठेवलं जाणार होतं. या नावाचंही महाराष्ट्राशी कनेक्शन आहे. ज्योतिरादित्य यांची आजी जोतिबाची भक्त होती. आपल्या नातवाचं नाव जोतिबा ठेवावं, अशी त्यांच्या आजीची इच्छा होती. मात्र ज्योतिरादित्य यांच्या आई-वडिलांनी एक वेगळंच नाव सुचवलं होतं. आई माधवीराजे आणि वडील माधवराव यांनी आपल्या मुलाचं नावं विक्रमादित्य ठेवण्याचं ठरवलं होतं. 1 जानेवारी 1971 या दिवशी जन्म झालेल्या राजघराण्यातील या मुलाचं नाव अखेर ज्योतिरादित्य असं ठेवण्यात आलं.
2001मध्ये वडील माधवराव यांच्या मुलानंतर ज्योतिरादित्य हे ग्वालियरचे नवे महाराज बनले. त्यांचे वडील माधवराव सिंधिया हे काँग्रेसचे कट्टर सदस्य होते. ते 9 वेळा खासदार राहिले होते. दिग्गज नेता असलेल्या माधवराव सिंधिया यांच्या बहिणीही राजकारणात सक्रिय होत्या. हाच वारसा ज्योतिरादित्य सिंधिया यांनाही मिळाला.
100 वर्षानंतर मिळालेला वारसदार
ज्योतिरादित्य यांच्या जन्मानंतर ग्वालिअरमध्ये मोठा उत्सव साजरा करण्यात आला होता. कारण ग्लालिअरच्या राजघरण्याला पहिल्यांदाच हक्काचा आणि सख्ख्या रक्ताचा वारसदार मिळाला होता. 100 वर्षांपूर्वी वासरदार नसल्यानं सिंधिया घराण्याला आपला वंशट टिकून राहावा यासाठी मुलाला दत्तक घ्यावं लागलं होतं.