विकृतीचा कळस! चॉकलेट देण्याचा बहाण्याने मुलांचं लैंगिक शोषण

Big_Breaking akola
Big_Breaking akola

अकोला - राज्यातील मुलांवरील होणारे अत्याचार काही केल्या थांबायचं नाव घेत नाही आहेत. अकोल्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर येतेय. चॉकलेट देण्याचा बहाण्याने तीन अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एका बँक अधिकाऱ्याने हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जयप्रकाश नारायण गावंडे असं आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. या 53 वर्षिय इसमाविरोधात सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.


नेमकं प्रकरण काय आहे?


अकोल्यातील विकृत बँक अधिकारी तीन मुलांना चॉकलेट देण्याच्या बहाण्याने दुपारी घरी बोलवायचा. पीडित मुलं सातवी ते आठवीच्या वर्गातील असल्याची माहिती मिळतेय. दुपारी घरी बोलावून हा नराधम अधिकारी त्या मुलांसोबत अश्लील चाळे करायचा. १९ फेब्रुवारी रोजी दोन ते तीन पीडित मुलं या विकृताच्या सोबत रूममध्ये झोपलेल्या अवस्थेत आढळली. त्यातील एका पीडित मुलाच्या आजोबांनी हा प्रकार बघितला आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर या प्रकरणाचा त्यांनी जाब विचारला असता आपण मुलांना वाईट उद्देशाने बोलत नसून त्यांना चॉकलेट किंवा इतर काही वस्तू खाण्यासाठी देत असतो, त्यामुळे त्यांना बोलवतो अशी उलट मुजोरी आरोपीने केल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकारानंतर आरोपीने पीडित मुलांच्या नातेवाईकांना धमकावण्याचाजदेखील प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला आहे.

अखेर या मुलांच्या पालकांनी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना सर्व हकीकत सांगितल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण अधिक चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी पीडित मुलांच्या नातेवाईकांच्या  तक्रारीवरून  आरोपीविरुद्ध  पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील पीडित मुलांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. आता पोलिस या विकृत बँक अधिका-यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचंय. 
 

पाहा व्हिडीओ - 

kids molested in akola by bank officer crime rape shame

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com