राज्यात कायदा सत्ताधारी मंत्र्यासाठी वेगळा आणि विरोधी पक्षासाठी वेगळा आहे का ?  

ram kulkarni
ram kulkarni

बीड -   राज्यात कायदा सत्ताधारी मंत्र्यासाठी वेगळा आणि विरोधी पक्षासाठी वेगळा आहे का ? असा सवाल भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी Ram Kulkarni यांनी थेट मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांना केला आहे.विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर Pravin Darekar यांनी कोरोना Corona प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले म्हणुन बीड Beed पोलिसांनी Police गुन्हा दाखल केला. Is the law in the state different for the ruling minister and different for the opposition

मात्र नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinade यांनी बीडला कोविड सेंटरचे उद्घाटन करताना, कोरोना नियम पायदळी तुडवले, हजारावर गर्दी होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल का झाला नाही.असा सवाल  उपस्थित करत हा सतेचा गैरवापर असून पोलिस आणि जिल्हा प्रशासनची भुमीका संशयास्पद असल्याचे राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

हे देखील पहा -

बीडच्या अंतरवन पिंप्री गावात शिवसेनेच्यावतीने 500 बेडचे, स्व. बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन , शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. Is the law in the state different for the ruling minister and different for the opposition

यावेळी प्रमुख उपस्थिती रोहयो मंत्री संदिपान भुमरे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री सुरेश नवले, माजी मंत्री बदामराव पंडित, यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले होते. यामुळेचं भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.दरम्यान सर्वसामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उगरणारे प्रशासन आता या राजकीय नेत्यांवर गुन्हा दाखल करणार का ? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com