Food For Memory : वयाची 30 वी ओलाडल्यानंतर तुमचा विसरभोळेपणा वाढलाय ? आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

वयोमानानुसार तिशी ओलांडल्यानंतर मेंदूवर तुमच्या वयावर परिणाम होताना पहायला मिळतो.
Food For Memory
Food For MemorySaam Tv

Food For Memory : तुमची स्मरणशक्ती जाणे किंवा कमी होणे ही एक गंभीर समस्या आहे. ज्यामध्ये तुमचा मेंदू लवकर म्हातारा होण्याची शक्यता असते. वयोमानानुसार तिशी (३० वय ) ओलांडल्यानंतर मेंदूवर तुमच्या वयावर परिणाम होताना पहायला मिळतो.

यामध्ये तुमची स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बऱ्याचदा शंखपुष्पी या जडीबुटीचे सेवन केले जाते. परंतु शंखपुष्पी शोधणे हे जरा किचकट काम आहे. अशातच तुम्ही तुमच्या किचन मध्ये उपलब्ध असणाऱ्या काही पदार्थांचे सेवन केल्यास तुमचा मेंदू अतिशय तल्लक बनतो.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बाजारात (Market) वेगवेगळ्या प्रकारचे स्मरणशक्ती टॉनिक उपलब्ध आहेत. अशातच टॉनिकसाठी वेगळे पैसे (Money) खर्च न करता तुम्हाला तुमचा मेंदू घरबसल्या तल्लक बनवण्यास मदात होईल.

तुमच्या घरामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या खाल्ल्याने तुमचा मेंदू फास्ट गतीने काम करतो. आतापर्यंत तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल. याबद्दल जाणून घेऊया

Food For Memory
Winter Hair care : हिवाळ्यात केसांची चमक टिकावयची आहे ? 'या' टिप्स फॉलो करा

1. कॉफी

Coffee
Coffee canva

कॉफी (Coffee) ही आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी असते. कॉफीमध्ये उपलब्ध असणारे कॅफिन हे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते. दररोज कॉफीचं सेवन केल्याने तुमच्या मेंदूच्या विकासात वाढ होते. कॉफीच्या सेवनाने तुम्ही नेहमी सतर्क राहता आणि तुमच्या फोकसकडे लक्ष देता. म्हणजेच कॉफी ही तुमच्या मेंदूच्या विकासासाठी हातभार लावते.

2. हळदी

Turmeric
Turmeric canva

हे देखील तुमच्या मेंदूच्या विकासासाठी अत्यंत लाभदायक असते. तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यास जास्त वेळ लागत असेल तर किचनमध्ये असलेल्या हळदीचं सेवन करण्यास सुरू करा. हळदीमध्ये (Turmeric) कर्क्युमिन असल्यामुळे ते स्मरणशक्तीसाठी चांगले असते. त्याचबरोबर ही तुम्हाला डिप्रेशनमध्ये जाण्यापासून वाचवते.

3. ब्रोकोली

Broccoli
Broccoli canva

ब्रोकली ही भाजी देखील मेंदूच्या विकासास चालना देण्याचं काम करते. भारतामध्ये ब्रोकली ही अत्यंत कमी प्रमाणात पाहायला मिळते. परंतु इतर देशांमध्ये ब्रोकलीचे सेवन जास्त प्रमाणात केली जाते. ब्रोकलीमध्ये विटामिन भरपूर प्रमाणात असते. फॅट सोल्युबल हे विटामिन मेमरी शार्प करण्यास मदत करते.

4. भोपळ्याच्या बिया

Pumpkin seeds
Pumpkin seeds canva

भोपळ्यामधील बिया खाऊन तुम्ही तुमच्या मेंदूला गतिशील बनवू शकता. भोपळ्याच्या बियांमध्ये एंटीऑक्सीडेंट असतात. जे आपल्या मेंदूला फ्री मेडिकल डॅमेजपासून वाचवतात. त्याचबरोबर भोपळ्यांच्या बियांमध्ये असलेले मॅग्नेशियम, कोपर आणि आयन यांसारख्या तत्वांमुळे मेंदूचा जास्त प्रमाणात विकास होण्यास मदत होते.

5. संत्री

Oranges
Oranges canva

संत्री हे फळ देखील मेंदूच्या वाढत्या विकासात मदत करते. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते. त्यामुळे मेमरी, फोकस निर्णय क्षमतेमध्ये वाढ होते. त्यामुळे सर्वांनीचं संत्र्याचे सेवन केलं पाहिजे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com