Benefits Of Herbs : स्वयंपाकघरातील 'हे' 4 पदार्थ खा, सर्दी-खोकल्याला बाय बाय करा !

थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी - खोकला आणि तापापासून आराम मिळावा म्हणून हर्ब्जचा वापर केला जायचा.
Benefits Of Herbs
Benefits Of HerbsSaam Tv

Benefits Of Herbs : पूर्वीच्या काळात लोक आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरगुती मसाल्यांचे उपाय करायचे. त्याचबरोबर भरपूर औषधांनी विविध प्रकारच्या आजारांना नॅचरल ट्रीटमेंट म्हणून प्रयोग केले जातात.

त्याचबरोबर वायरल इन्फेक्शन पासून ते तुमच्या खरचटण्यापर्यंत त्याचबरोबर सर्दी - खोकला यांसारखे अनेक आजारांवर घरगुती औषधे उपयोगी ठरायची

थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी - खोकला आणि तापापासून आराम मिळावा म्हणून हर्ब्जचा वापर केला जायचा. तुळसी, काळी मिरी यांसारख्या गोष्टींचा देखील वापर केला जायचा. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या सगळ्या मसाल्यांचा कोणताही साईड इफेक्ट व्हायचा नाही.

हे हर्ब्ज फक्त इन्फेक्शनचं दूर नाही करायचे. तर इतर देखील फायदे (Benefits) होतात. जाणून घेऊ घरगुती मसाल्यांचे (Home remedies) फायदे.

Benefits Of Herbs
Winter Health Tips : हिवाळ्यात दिवसभर उत्साही राहण्यासाठी या 6 गोष्टी रोज खा

हेल्थलाईननुसार काही सामान्य हर्ब्ज जसे तुळशी, ओरिगानो यांसारख्या वनस्पतींमध्ये अनेक अँटीव्हायरल इफेक्ट असतात. जी अनेक वायरल इन्फेक्शनपासून आराम देतात. हे पॉवरफुल हर्ब्ज तुम्ही तुमच्या डायटमध्ये सामिल करू शकता.

1. ओवा :

ओवा आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतो. ओव्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे चांगले फायदे होऊ शकतात. ओव्यामध्ये कॅल्शियम, थायमीन, राईबोफ्लेविन, फायबर हे सगळे गुण जास्त प्रमाणात असतात. हे पोटाच्या विकारांवर रामबाण उपाय ठरू शकतात. त्याचबरोबर घशाच्या समस्यांवर देखील हे सगळे पदार्थ गुणकारी असतात. त्याचरोबरोबर या सगळ्या औषधांमुळे सूज देखील कमी होते.

2. दालचिनी :

दालचिनीमध्ये अँटिव्हायरल आणि एंटीबॅक्टरियल सोबतच अँटीफंगलचे गुण असतात. हेल्थला व्यवस्थीत ठेवणे आणि ब्लड प्रेशर (Blood Pressure) नियंत्रित ठेवण्यासाठी दालचीनी गुणकारी ठरते. एवढंच नाही तर आपल्या बौद्धिक वाढीसाठी देखील दालचिनी उपयुक्त असते.

3. काळी मिरी :

काळी मिरी ही आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. काळया मिरीमध्ये जिंक, आयरन, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी आणि मॅग्नेशियम ही तत्वे जास्त प्रमाणात असतात. एवढंच नाही तर वजन कमी करणे, पोट साफ करणे, शरीर डिटॉक्सिफाइ करणे, रेड ब्लड सेल्स प्रोड्यूज करणे इत्यादी फायदे असतात.

Benefits Of Herbs
Benefits Of HerbsCanva

4. सुंठ :

सुंठ हे आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी असते. सुंठामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अंतीबॅक्टरियल प्रॉपर्टीज असतात. एवढेच नाही तर सुंठ हे आपल्या शरीरामधील वाताला नियंत्रित ठेवण्याचे काम करते. त्याचबरोबर सुंठ अर्थराइटिस , सूज , गुडघ्यांचे दुखणे कमी करणे यांसारख्या समस्यांवर फायदेशीर ठरते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com