Bhaubhij 2022 : भाऊबीज आणि रक्षाबंधन हे सण वेगळे का आहेत ?

दिवाळीच्या दोन दिवसांनी भाऊबीज साजरा केला जातो.
Bhaubhij 2022
Bhaubhij 2022Saam Tv

Bhaubhij 2022 : दिवाळी हा सणांचा राजा. या सणात सर्वत्र रोषणाई, फराळ, मिठाई व आतेबाजी असते. धनत्रयोदशीपासून सुरू झालेला दिवाळीचा सण संपूर्ण भारतात ३ ते ४ दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीच्या (Diwali) दोन दिवसांनी भाऊबीज साजरी केला जातो. भाऊबीज आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण भाऊ-बहिणीचे सण आहेत, पण या दोन्ही सणांचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे.

अनेकांच्या मनात असा विचार येत असेल की, रक्षाबंधन हे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते, मग भाऊबीज म्हणजे काय? यात इतके वेगळे काय आहे? हिंदू महिन्यातील श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरा केला जातो तर कार्तिक शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज साजरी (Celebrate) केली जाते. (Latest Marathi News)

Bhaubhij 2022
Diwali Padva : साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या दिवाळी पाडव्याला का आहे अधिक महत्त्व

जाणून घ्या काय आहे रक्षाबंधनाची कहाणी?

रक्षाबंधनाचा उगम महाभारतातील घटनादरम्यान झाला. असे म्हटले जाते की, जेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने चुकून आपले बोट कापले तेव्हा राजकुमारी द्रौपदीने तिच्या साडीचा तुकडा फाडला आणि रक्तस्त्राव थांबवण्यासाठी त्याच्या बोटावर पट्टी बांधली. यामुळे भगवान कृष्ण इतके प्रभावित झाले की त्यांनी नेहमीच त्यांचे रक्षण करण्याची शपथ घेतली. तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाऊ लागला.

भाऊबीजेमागची कथा काय आहे?

यमराज आणि यमुना हे भाऊ-बहीण होते. यमराज आणि यमुना ही सूर्यदेव आणि छाया यांची मुले होती. कामाच्या अतिरेकामुळे यमराज यमुना भेटायला जाऊ शकले नाहीत, असे म्हणतात. पण यमुना तिला खूप बोलावत होती. एके दिवशी यमराज यमुना नदीच्या काठावर भेटले. यमुना हे पाहून खूप खुश झाली आणि तिने आपल्या भावाचे खूप स्वागत केले. यमुनेने तिचा भाऊ यमराजाला सांगितले की, आजपासून दरवर्षी तू या दिवशी मला भेटायला येशील. आणि तेव्हापासून कार्तिक शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशीचा दिवस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.

Bhaubhij 2022
Diwali 2022 : दिवाळीत अशी घ्या आरोग्याची काळजी, सणांचा आनंद होईल द्विगुणित

दोन्ही दिवशी बहिणी आपल्या भावाचे वाईट नजरेपासून संरक्षण करण्याचे व्रत घेतात. तसेच बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करते. भाऊबीजेच्या दिवशी बहिणी आपल्या भावाची आरती करते, तर रक्षाबंधनाला बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते. रक्षाबंधनाला धागा म्हणजे भाऊ आपल्या बहिणीचे कोणत्याही वाईटापासून रक्षण करेल, तर भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर तिलक लावते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com