
Bones Health Tips : चांगल्या आरोग्यासाठी हाजे मजबूत असणे अंत्यत आवश्यक आहे. हाडे आपल्या शरीराला चालना देण्यास व अवयवांचे संरक्षण करण्यास मदत देतात.
हे देखील पहा -
बालपणात आणि पौगंडावस्थेमध्ये मजबूत आणि निरोगी हाडे तयार करणे महत्त्वाचे असले तरी, प्रौढावस्थेत हाडांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे. अशा अनेक पोषण आणि जीवनशैलीच्या सवयी आहेत ज्या आपल्याला मजबूत हाडे तयार करण्यात आणि वयानुसार त्यांना मजबूत ठेवण्यास मदत करू शकतात.
एका अभ्यासानुसार, बालपण, पौगंडावस्थेतील आणि प्रौढावस्थेत आपल्या हाडांमध्ये खनिजे मिसळली जातात. वयाच्या ३० वर्षांनंतर हाडांच्या खनिजांची घनता थांबते. म्हणजेच कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण स्थिर होते. या काळात पुरेशी हाडांची खनिज घनता नसल्यास, हाडांचे नुकसान झाल्यावर नाजूक हाडे विकसित होण्याचा धोका वाढतो. त्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा हे जाणून घेऊया.
कॅल्शियम शोषून घेण्यासाठी आपल्या शरीराला व्हिटॅमिन डीची गरज असते. १९ ते ७० वयोगटातील प्रौढांना दिवसाला ६०० IU व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. तर ७१ पेक्षा जास्त वय असणाऱ्या वयोवृध्दांना ८०० IU व्हिटॅमिन (Vitamins) डीची आवश्यकता असते. त्यासाठी आपण आहारात तेलकट मासे जसे की सॅल्मन, ट्राउट, व्हाइट फिश आणि ट्यूनाचे सेवन करु शकतो. व्यतिरिक्त, मशरूम, अंडी आणि फोर्टिफाइड पदार्थ, दूध आणि तृणधान्ये यांचा देखील समावेश करु शकतो.
आहारात प्रथिनांचा समावेश करताना आपल्या वजनानुसार त्याचे सेवन करायला हवे. त्यासाठी आहारात दूध (Milk), राजमा, दही, हरभरा, सोयाबीन, कोबी, मटार, पालक, मशरूम यासारखे पदार्थ रोज घेऊ शकता.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.