Breast Cancer : स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढला; आजार टाळण्यासाठी डॉक्टरांना 'हे' सहा प्रश्न विचाराच...

Breast Cancer Causes : या आजारात ५० टक्क्यांहून अधिक रूग्‍णांमध्‍ये निदानानंतर हा आजार पुन्‍हा होण्‍याचा दर ५ वर्षांचा आहे.
Breast Cancer
Breast CancerSaam tv

Breast Cancer Symptoms : स्तनाचा कर्करोग हा आजार जागतिक स्तरावर महिलांमध्ये आढळून येतो. खरेतर, हा आजार अल्‍पावधीत किंवा दीर्घकाळानंतर पुन्‍हा होऊ शकतो. या आजारात ५० टक्क्यांहून अधिक रूग्‍णांमध्‍ये निदानानंतर हा आजार पुन्‍हा होण्‍याचा दर ५ वर्षांचा आहे.

ही आकडेवारी चिंताजनक असली तरी आजार (Disease) पुन्‍हा होणे म्‍हणजे सर्वकाही संपले असा अर्थ होत नाही हे माहीत असणे महत्त्वाचे आहे. या काळात निदान, उपचार व पुढील गोष्टी समजून घेण्यासाठी डॉक्टरांसोबत खुल्या मनाने व माहितीपूर्ण संवाद साधणे देखील गरजेचे आहे. याबाबतीत स्वत:ला सक्षम करणे महत्त्वाचे आहे.

Breast Cancer
World Ovarian Cancer Day 2023 : महिलांना गर्भाशयच्या कर्करोगाचा अधिक धोका ! कसे ओळखाल ? जाणून घ्या लक्षणे

मुंबईतील टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्‍या अॅडवान्‍स्‍ड सेंटर फॉर ट्रिटमेट, रिसर्च अॅण्‍ड एज्‍युकेशन इन कॅन्‍सर (एसीटीआईसी)चे संचालक डॉ. सुदीप गुप्‍ता म्‍हणाले, विशेषत: शहरी भारतामध्‍ये स्‍तनाचा कर्करोगाच्‍या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशा रूग्‍णांना उपलब्‍ध उपचारांबाबत माहीत असणे, डॉक्‍टरांसोबत खुल्‍या मनाने चर्चा करणे महत्त्वाचे आहे. यामुळे १० ते २० टक्के रुग्णांमध्ये हा आजार पुन्हा होण्याचा धोका (Danger) कमी करु शकतो.

हे प्रश्न तुम्ही डॉक्टरांना विचारु शकता

1.स्‍तनाचा कर्करोगाचा टप्‍पा कोणता आहे आणि त्‍याचा अर्थ काय?

स्‍तनाचा कर्करोगाचा टप्‍पा माहीत असणे योग्‍य उपचार योजना आखण्‍यासाठी महत्त्वाचे आहे. डॉक्‍टरांना कर्करोगाचा टप्‍पा, कर्करोगाच्‍या (Cancer) गाठीचा आकार, जवळचे लिम्‍फ नोड्स किंवा शरीराच्‍या इतर भागांवर पसरेल का आणि त्‍याच्‍या संभाव्‍य परिणामांबाबत स्‍पष्‍टपणे विचारा. टप्‍प्‍याबाबत माहिती असल्‍यास तुम्‍ही आजाराच्‍या प्रमाणावर, पुन्‍हा आजार होण्‍याच्‍या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासोबत उपलब्‍ध उपचार पर्यायांचे व्‍यवस्‍थापन करू शकता.

Breast Cancer
Breast Cancer : योगामुळे वाचेल स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांचे प्राण, मृत्यूचा धोका १५ टक्क्यांनी होईल कमी

2. या आजारावर पर्याय कोणते?

तुमच्‍या विशिष्‍ट स्‍तनाच्या कर्करोगासाठी उपलब्‍ध उपचार पर्यायांबाबत चौकशी करा. डॉक्‍टरांना प्रत्‍येक उपचार पर्यायाचे फायदे, जोखीम व संभाव्‍य दुष्‍परिणाम विचारा. तसेच केमोथेरपीपलीकडील नुकत्‍याच प्रगत उपचारांबाबत विचारा. जे तुम्‍हाला दीर्घकाळापर्यंत जीवन जगण्‍यास, तसेच आजार पुन्‍हा न होण्‍याची खात्री देत सर्वोत्तम जीवन जगण्‍यास मदत करू शकतात.

3. आजार पुन्‍हा होण्‍याचा धोका काय आहे? पुन्‍हा झालेल्‍या आजाराचा प्रकार कोणता?

सर्जरीनंतर किंवा आजार पुन्‍हा झाल्‍यानंतर स्‍तनाचा कर्करोगाचा कोणता टप्‍पा आहे या आधारावर आजार पुन्‍हा होण्‍याचा धोका समजून घेणे महत्त्वाचे आहे. पुन्‍हा झालेला आजार हाडे, यकृत किंवा फुफ्फुसे यांसारख्‍या शरीराच्‍या इतर भागांपासून लोकल किंवा डिस्‍टण्‍ट मेटास्‍टॅसिस असू शकतो. स्‍तनाचा कर्करोगाचा प्रकार व टप्‍प्‍यानुसार धोक्यामध्ये बदल होऊ शकतो. ही माहीती माहीत असल्‍यास पुढील निर्णय घेण्‍यास मदत होईल.

Breast Cancer
Breast Cancer : 'या' कारणांमुळे महिलांना होऊ शकतो स्तनाचा कर्करोग, वेळीच व्हा सावध..

4. उपचार कसा कराल ?

उपचाराच्‍या संभाव्‍य परिणामांबाबत चर्चा करणे महत्त्वाचे आहे. शिफारस केलेल्‍या उपचाराचा तुमच्‍या दैनंदिन क्रियाकलाप, शारीरिक स्‍वास्‍थ्‍य, भावनिक आरोग्‍य व जीवनाच्‍या दर्जावर काय परिणाम होईल, याबाबत डॉक्‍टरांना विचारा. उपचारादम्यानतुमचे स्‍वास्‍थ्‍य सुधारण्‍यासाठी उपचाराशी संबंधित दुष्‍परिणाम व मार्गांच्‍या व्‍यवस्‍थापनाकरिता धोरणांबाबत चौकशी करा.

5. सहाय्यक केअर सेवा उपलब्‍ध आहेत का?

स्‍तनाचा कर्करोगाचा सामना करणे शारीरिकदृष्‍ट्या व भावनिकदृष्‍ट्या आव्‍हानात्‍मक असू शकते. हेल्‍थकेअर केंद्राद्वारे प्रदान केल्‍या जाणाऱ्या सहाय्यक केअर सेवांबाबत चौकशी करा. यामध्‍ये बहुआयामी टीमच्‍या उपलब्‍धतेचा समावेश असू शकतो, जसे ऑन्कोलॉजी नर्सेस, सामाजिक कार्यकर्ते, सायकोलॉजिस्‍टस, न्‍यूट्रिशनिस्‍ट्स व पॅलिएटिव्‍ह केअर स्‍पेशालिस्‍ट्स. सहाय्यक केअर सेवा तुमचा व्‍यवस्‍थापन प्रवास कार्यक्षमपणे नेव्हिगेट करण्‍यास मदत करण्‍यासाठी मार्गदर्शन, भावनिक पाठिंबा, लक्षणांवर व्‍यवस्‍थापन व संसाधने प्रदान करू शकतात.

Breast Cancer
Cheating in Relationship : रिलेशनशीपमध्ये पुरुषांपेक्षा महिला अधिक का असतात विश्वासघाती...

6. दीर्घकालीन परिणाम व वाचण्‍याची स्थिती काय आहे?

डॉक्‍टरांसोबत स्‍तनाचा कर्करोगाचे दीर्घकालीन परिणाम व वाचण्‍याच्‍या स्थितीबाबत चर्चा करा. भविष्‍यात पुन्‍हा आजार होण्‍याची शक्‍यता, देखरेख व फॉलो-अपची गरज आणि आरोग्‍य उत्तम राखण्‍यासाठी धोरणे याबाबत विचारा. व्‍यायाम, आहार व तणाव व्यवस्थापन अशा जीवनशैली बदलांबाबत चौकशी करा, ज्‍यामुळे दीर्घकाळापर्यंत स्वास्थ्य उत्तम राहण्‍यास मदत होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com