Chaturgrahi Yog 2023 in Mesh : मेष राशीत बनतोय चतुर्ग्रह योग, या 4 राशींना लागणार लॉटरी, मिळेल पैसाच पैसा !

Chaturgrahi Yoga : १२ वर्षांनी मेष राशीत चतुर्ग्रह योग तयार होत आहे. हा योग काही लोकांसाठी शुभ असेल.
Chaturgrahi Yog 2023 in Mesh
Chaturgrahi Yog 2023 in MeshSaam Tv

Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे शुभ व अशुभ योग तयार होत असतात. ज्याचा प्रभाव हा मानवी जीवनावर पडत असतो. अशातच १२ वर्षांनी मेष राशीत चतुर्ग्रह योग तयार होत आहे. हा योग काही लोकांसाठी शुभ असेल.

यावेळी राहू, गुरु आणि बुध हे मंगळ राशीत मेष राशीत आहेत. याशिवाय चंद्राचेही कर्क राशीत परिवर्तन झाले आहे. अशाप्रकारे 4 ग्रह मेष राशीत आहेत, ज्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात (Astrology) चतुर्ग्रही योग अत्यंत शुभ मानला जातो. चला जाणून घेऊया मेष राशीमध्ये बनलेल्या चतुर्ग्रही योगामुळे कोणत्या राशींना फायदा (Benefits) होईल.

Chaturgrahi Yog 2023 in Mesh
Best Day to Cut Nails : नखे कापण्यासाठी हा दिवस शुभ;अचानक होईल धनलाभ, नाहीतर दारिद्रयाचा सामना

चतुर्ग्रही योग या राशीच्या लोकांना भरपूर लाभ देईल

1. कर्क राशी :

चतुर्ग्रही योग कर्क राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मोठा लाभ देईल. या लोकांची प्रगती होईल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. अडकलेले पैसे (Money) मिळतील. आर्थिक धनलाभ होईल. समाजात मान-सन्मान वाढेल.

2. वृश्चिक राशी :

चतुर्ग्रही योग वृश्चिक राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. या लोकांना नोकरीत प्रमोशन मिळू शकते, पगार वाढ होऊ शकते. मानसिक शांती मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल.

Chaturgrahi Yog 2023 in Mesh
Shani Jayanti 2023 : कुंडलीतील या स्थानात असेल शनि तर व्हाल मालामाल, नाहीतर सतत राहाल कंगाल...

3. मकर राशी :

चतुर्ग्रही योग मकर राशीच्या लोकांना विशेष लाभ देईल. व्यावसायिकांना फायदा होईल. बँक बॅलन्स वाढेल. नोकरीत बढती मिळेल. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होईल. पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग तयार होतील. चांगल्या बातमीमुळे मन प्रसन्न होईल.

4. मीन राशी :

चतुर्ग्रही योग मीन राशीच्या लोकांना प्रत्येक कामात साथ देईल. गुंतवणुकीतून लाभ होईल. तुमचा नफा वाढेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. आरोग्य चांगले राहील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com