
Child Teeth Care : हल्ली दात किडण्याचे प्रमाण मुलांमध्ये सामान्य झाले आहे. त्यामुळे मुले अवघे ४ ते ५ वर्षाचे झाल्यानंतर त्यांना दात दुखीच्या समस्या जाणवू लागतात.
हे देखील पहा -
मुलांचे दात किडण्यामागचे मुख्य कारण त्यांनी खालेले पदार्थ सतत तोंडात जात असते. दात व तोंड व्यवस्थित स्वच्छ न केल्यामुळे तोंडात साखरचे प्रमाण वाढून जंतूचे घर होऊ लागते त्यामुळे दात दुखू लागतात. मुलांच्या आहारात जास्त प्रमाणात दूध, सोडा, चॉकलेट,केक, ब्रेड व बिस्कीट सारखे पदार्थ अधिक असतात. दात किडण्यासाठी तोंडातील लाळ प्रभावी ठरते. त्यासाठी लहांनापासून मोठ्यापर्यंत प्रत्येतकांने दातांची योग्य निगा राखायला हवी. त्यासाठी मुलांच्या दाताची काळजी ही बाल्यावस्थेपासून घ्यायला हवी ती कशी हे जाणून घेऊया.
१. लहान मुलांचे दात काळे व पिवळसर पडतात त्यामुळे त्यांच्या तोंडाचा सतत वास येत असतो. त्यामुळे पोट दुखी, कान, नाक व घशाचे विकार, डायबिटिस, उच्च रक्तदाबाच्या समस्या निर्माण होतात. मुलांच्या तोंडात अन्नाचे कण सतत साठून राहिल्यामुळे तोंडाचा वास येऊ लागतो.
२. मुले आपल्याकडे चॉकलेट (Chocolate) खाण्याचा हट्ट धरतात त्यामुळे पालक त्यांना ते लगेच देतात. कोणत्याही चिकट किंवा गोड पदार्थांचे सेवन केल्यावर त्याचे कण हिरड्या व दातांवर चिकटून राहाते. त्यामुळे दातांचे आरोग्य बिघडते.
३. मुलांना दिवसातून दोन वेळा ब्रश करायला सांगावा. तसेच कोणतेही पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा जेवल्यानंतर गुळणा करायला सांगावा ज्यामुळे दातात किंवा हिरड्या कण चिकटणार नाही व दात किडणार नाही.
४. जन्मलेल्या बाळांच्या (Baby) हिरड्यांची काजळी घेणे अधिक आवश्यक आहे. बाळाने दूध प्यायल्यानंतर आईने त्याच्या हिरड्या स्वच्छ करणे अधिक महत्त्वाचे आहे. ज्यामुळे बाळाला दात येतांनी अधिक त्रास होणार नाही. मुलांच्या प्रत्येक टप्प्यांत त्यांच्या दातांची काळजी आपण घ्यायला हवी.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.